The Kerala Story Released In West Bengal: अखेर पश्चिम बंगालमध्ये 'द केरला स्टोरी' प्रदर्शित; कोर्टाच्या निर्णयानंतर निर्मात्यांना दिलासा

The Kerala Story In West Bengal: 'द केरला स्टोरी' चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती.
The Kerala Story Released In West Bengal
The Kerala Story Released In West BengalInstagram @sunshinepicturesofficial

The Kerala Story Received Big Hit In West Bengal: 'द केरला स्टोरी' चित्रपटाला होणार विरोध आता क्षमताना दिसत आहे. या वादग्रस्त चित्रपटाला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई करत बिग बजेट चित्रपटांना मागे टाकले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी 'द केरला स्टोरी' चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, निर्मात्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

'द केरला स्टोरी' चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती. परंतु आता या चित्रपटाला थिएटर मिळाले आहे. वादांच्या भोवऱ्यात अडकलेला अदा शर्माचा हा चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये दाखवला जात आहे.

पश्चिम बंगालमधील 'द केरला स्टोरी' चित्रपटावरील बंदी सुप्रीम कोर्टाने आठवड्याभरापूर्वी उठवली होती. पण तरीही चित्रपट, चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नव्हता. निर्माते आणि वितरकांनी दावा केला होता की त्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत.

The Kerala Story Released In West Bengal
Jr NTR Fans Arrested: ज्युनियर एनटीआरच्या बर्थडेला चाहत्यांचा नुस्ता राडा, बोकडाचा बळी देत केले जंगी सेलिब्रेशन

चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार पश्चिम बंगाल राज्यात 'द केरला स्टोरी'ला अखेर एक थिएटर मिळाले आहे. तर या विषयावर, काही चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्सच्या मालकांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे पुढील दोन आठवड्यांसाठी कोणतेही स्लॉट रिक्त नाहीत. सर्व स्लॉट फुल आहेत. त्यामुळे द केरला स्टोरी रिलीज करण्यासाठी त्यांना आणखी २ आठवडे लागतील.

दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांची द केरला स्टोरी ही ISIS च्या दहशतवाद्यांनी ब्रेनवॉश करून इस्लाम स्वीकारलेल्या स्त्रियांची कथा आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे, परंतु कथा एकतर्फी असल्याचे सांगून त्याचा विरोध सुरूच आहे. मात्र, अनेक राजकीय नेत्यांकडून चित्रपटाचे प्रमोशन केल्याचा आरोपही होत आहे.

The Kerala Story Released In West Bengal
The Kerala Story Crossed 200 Crore: 'द केरला स्टोरी' 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने केले 200 कोटींचे कलेक्शन

द केरला स्टोरी चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला पार केला आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपटाचे एकूण कलेक्शन २०६.९७ कोटी इतके झाले आहे. (Latest Entertainment News)

सुदिप्तो सेन दिगदर्शित 'द केरला स्टोरी' हा चित्रपट अवघ्या ३० करोडच्या बजेटमध्ये बनला आहे. हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपट परदेशात देखील प्रदर्शित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com