Jawan : रोमान्सचा बादशाह शाहरुख खान करणार २०० अभिनेत्रींसोबत अॅक्शन सीन

शाहरुख या आठवड्याच्या शेवटी चेन्नईमध्ये एका जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्ससाठी शूटिंग करणार आहे.
shahrukh khan
shahrukh khanSaamTv

मुंबई : बॉलिवूडचा रोमान्स बादशाह शाहरुख खान(Shahrukh Khan) त्याच्या आगामी 'जवान'(Jawan) चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. माहितीनुसार, शाहरुख या आठवड्याच्या शेवटी चेन्नईमध्ये एका जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्ससाठी शूटिंग करणार आहे.

shahrukh khan
Prajakta Mali : प्राजक्ता माळीची इच्छा हटके; मग काय चर्चा होणारच...व्हिडिओ झाला व्हायरल

मीडिया रिपोर्टनुसार, या मेगा-अॅक्शन सीनच्या शूटिंगसाठी एक मोठा सेट आधीच उभारण्यात आला आहे. एवढेच नाही तर शाहरुख खान २०० अभिनेत्रींसोबत हा सीन शूट करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. अशी चर्चा आहे की चित्रपटाचे दिग्दर्शक, ऍटलीने मुंबईत सुमारे २०० ते २५० 'महिला व्यवस्थापन अधिकारी' क्राउडसोर्स केले आहेत जे शूटिंगसाठी चेन्नईला जाणार आहेत.

सात दिवसांच्या कालावधीत या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग होण्याची शक्यता आहे. मात्र, शूटिंगबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या वर्षी जून महिन्यामध्ये 'जवान' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. ज्यामध्ये शाहरुख खान जखमी अवस्थेत दिसला होता.

shahrukh khan
TMKOC Update : 'या' कारणामुळे 'तारक मेहता....'च्या लेखकाने संपवलं होतं आयुष्य

शाहरुख खान एका मुलाखतीत 'जवान'या चित्रपटाबद्दल म्हणाला, 'जवान ही अशी कथा आहे जी कोणत्याही विशिष्ट प्रदेशाशी संबंधित नाही आणि प्रत्येकाच्या आनंदासाठी आहे. हा अनोखा चित्रपट बनवण्याचे श्रेय ऍटलीला जाते, हा चित्रपट माझ्यासाठीही एक अद्भुत अनुभव आहे, कारण मला अॅक्शन चित्रपट आवडतात!'

शाहरुख खानशिवाय 'जवान' या चित्रपटामध्ये नयनताराही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेतुपतीही या चित्रपटात असल्याची चर्चा आहे. 'जवान' या चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटलीने केले आहे. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'जवान' व्यतिरिक्त शाहरुख खान 'पठाण' आणि 'डंकी'मध्येही दिसणार आहे. 'पठाण'मध्ये शाहरुख दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत स्क्रीन शेअर करणार आहे, तर 'डंकी'मध्ये शाहरुख खान तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. सलमान खानच्या 'टायगर ३' मध्येही तो अॅक्शन सीनमध्ये दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Edited By - Shruti Kadam

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com