Sam Bahadur : 'सॅम बहादूर' बायोपिक लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्मात्यांनी शेयर केले खास फोटो

विकी कौशल त्याच्या आगामी 'सॅम बहादूर' या सिनेमाच्या तयारीत व्यग्र आहे.
Vicky Kaushal as 'Sam Bahadur'
Vicky Kaushal as 'Sam Bahadur' Saam Tv

मुंबई : बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) हा वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'मसान' पासून ते 'संजू'(Sanju) सिनेमापर्यंत असेक वेगवेगळ्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. सध्या विकी कौशल त्याच्या आगामी 'सॅम बहादूर'(Sam Bahadur) या सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या 'सॅम बहादूर'मधील फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत विकी कौशलचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी रिलीज केल्यापासून, या सिनेमात विकी कौशलला आणखी एक आव्हानात्मक भूमिकेत पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. दरम्यान, विकीने त्याच्या भूमिकेसाठी तयारी सुरू केली असताना, निर्मात्यांनी या बहुप्रतिक्षित सिनेमातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Vicky Kaushal as 'Sam Bahadur'
जान्हवीनं 'या' अभिनेत्याला विकलं तिचं अलिशान घर; किंमत ऐकून सर्वसामान्यांचे डोकेच चक्रावून जाईल

या फोटोमध्ये 'सॅम बहादूर'ची संपूर्ण टीम स्क्रिप्ट वाचताना आणि त्यावर चर्चा करताना दिसत आहे. एका फोटोत, विकी त्याची सहअभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेखसोबत स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे, तर निर्माते रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार शेवटच्या दोन फोटोंमध्ये हसताना दिसत आहेत.

Vicky Kaushal as 'Sam Bahadur'
Kareena Kapoor Khan : तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चेवर करीना कपूर संतापली; म्हणाली, 'मी मशीन आहे का?'

बहादूर माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित 'सॅम बहादूर' या सिनेमात विकी कौशल त्यांची भूमिका पडद्यावर साकारताना दिसणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. वास्तविक, सिनेमाचा लूक रिलीज झाल्यापासून विकी कौशल हा सॅमच्या व्यक्तिरेखेशी मिळता-जुळता असल्याचे सर्वांनाच वाटू लागले आहे.

सॅम माणेकशॉ यांची लष्करी कारकीर्द चार दशके आणि पाच युद्धांची आहे. फील्ड मार्शल पदावर बढती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धातील त्यांच्या विजयामुळे बांग्लादेशची निर्मिती झाली. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल, सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख हे मुख्य भूमिकेत आहेत. रॉनी स्क्रूवाला निर्मित हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com