Thank God Song : नोरा-सिद्धार्थच्या बोल्ड केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडिओ

'थँक गॉड' चित्रपटातील 'माणिके' हे नवीन गाणे आज रिलीज झाले आहे.
Thank God Song Manike
Thank God Song ManikeSaam Tv

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) , अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांचा मल्टीस्टार चित्रपट 'थँक गॉड' (Thank God) मधील 'माणिके' हे नवीन गाणे आज रिलीज झाले आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा बोल्ड स्टाइल डान्स पाहायला मिळत आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

Thank God Song Manike
Upcoming Marathi Movies: आगामी वर्षात प्रेक्षकांसाठी खास भेट; वेगवेगळ्या धाटणीच्या सात चित्रपटांची घोषणा

नुकतेच 'थँक गॉड' चित्रपटातील 'माणिके' हे गाणे रिलीज झाले आहे, हे गाणं टी-सीरीजने आपल्या यूट्यूब चॅनलवरून शेअर केले आहे. हे नवीन गाणे रिलीज होताच शोषल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्ह्यराल होतं आहे. नोरा फतेही (Nora Fatehi) आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या डान्स मूव्हने लोकांची मने जिंकली आहेत. नोराचा किलर डान्स आणि व्हिडीओमधला लूक पाहून तुम्हीही तिच्यासाठी वेडे व्हाल. नोरासोबत सिद्धार्थ मल्होत्राची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. नेहमीप्रमाणेच नोराने यावेळीही आपल्या स्टाईलने या गाण्यांमध्ये चारचांद लावले आहेत.

Thank God Song Manike
Urfi Javed Video : "तू का एवढा लाजतोस?" लाजणाऱ्या फोटोग्राफरमुळे उर्फी जावेद का होतेय ट्रोल

सुरिया रंगनाथन, योहानी आणि जुबिन नौटियाल यांनी 'माणिके' गाण्याला आपला आवाज दिला आहे. गाण्याचे बोल रश्मी विराग आणि दुलांजा आल्विस यांनी लिहिले आहेत. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​'अयान'ची भूमिका साकारत आहे, तर अजय देवगण 'चित्रगुप्त'च्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, हा ट्रेलर खूपच मनोरंजक असल्याचे प्रेक्षक सांगत आहेत. याशिवाय रकुल प्रीत सिंह सिद्धार्थ मल्होत्राची पत्नी आणि पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'थँक गॉड' पुढील महिन्यात म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com