Oscars 2023: 'नाटु नाटु'च्या संगीतकारचा आनंद गगनात मावेना; ऑस्कर मिळाल्यानंतर गाण्यातून व्यक्त केल्या भावना

संगीतकार एमएम कीरावानी यांनी स्टेजवर गाणे गात भावना व्यक्त केल्या.
Natu Natu Song Won Oscars 2023
Natu Natu Song Won Oscars 2023Saam TV

MM Keeravani Speech On Oscars Stage: एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने इतिहास रचला आहे. आरआरआर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये ऑस्कर जिंकला आहे. प्रत्येक भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर या गाण्याने ऑस्करवर नाव कोरले आहे.

पुरस्कार जिंकल्यानंतर गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी यांनी स्टेजवर गाणे गात भावना व्यक्त केल्या आहेत. कीरावानी यांनी म्हटले आहे की, थँक यु अकादमी. मी कारपेंटर्स एकूण मोठा झालो आहे आणि आता मी ऑस्कर घेऊन इथे उभा आहे.' इतके बोलल्यानंतर किरवानी यांनी त्यांच्या भावना कवितेतून व्यक्त करायला सुरुवात केली. तसेच हे शक्य केल्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

Natu Natu Song Won Oscars 2023
Oscars 2023: भारताची ऑस्करमध्ये दमदार कामगिरी; The Elephant Whisperers ठरली सर्वोकृष्ट शॉर्ट फिल्म

कीरावानी आनंद गगनात मावेनासा झाला होता. तर ऑस्करच्या मंचावर गायक काल भैरव आणि हालू सिप्लिगंज यांनी 'नाटु नाटु' गाणे सादर केले.

आरआरआर चित्रपट परदेशातही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात ७५० कोटीचे कलेक्शन केले होते. तर जगभरात या चित्रापटाने ११०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.

चित्रपटाने ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिका साकारली आहे. अजय देवगण,आलिया भट्ट आणि श्रिया सरण यांचा कॅमिओ आहे.

गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकल्यानंतर संगीतकार एमएम कीरावानी भावुक झाले होते. तर आता ऑस्कर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com