Aryan Khan : पाकिस्तानी अभिनेत्री आर्यन खानवर झाली लट्टू, पोस्ट शेअर करत म्हणाली...

पाकिस्तानी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आर्यन खानचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे.
Aryan Khan
Aryan KhanSAAM TV

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान(Shahrukh Khan) आणि गौरी खान यांचा मोठा मुलगा आर्यन खान(Aaryan Khan) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आर्यनचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आले होते. वास्तविक, एनसीबीच्या टीमने गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता, जिथे आर्यन त्याच्या मित्रांसह उपस्थित होता. या घटनेने आर्यनला सर्वांच्या नजरेत खलनायक बनवले, त्यानंतर त्याचे आयुष्यच बदलून गेले. त्याचवेळी जामीन मिळाल्यानंतर आर्यनने लोकांना भेटणे बंद केले. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२२ रोजी ड्रग प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर काही महिन्यांनी आर्यनने सोशल मीडियावर पुन्हा एक्टिव्ह केले. दरम्यान, एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आर्यन खानचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे.

Aryan Khan
Thank God Song : नोरा-सिद्धार्थच्या बोल्ड केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडिओ

पाकिस्तानी अभिनेत्री सजल एलीही आर्यन खानची फॅन असल्याचं दिसत आहे. तिचाही आर्यनवर क्रश आहे. सजलने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर आर्यनचा जुना फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये आर्यनने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला असून त्यात तो खूपच सुंदर दिसत आहे. या स्टोरीच्या बॅकग्राउंडमध्ये शाहरुखच्या 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटामधील 'हवाईन' हे गाणे वाजते आहे. सजलने तिच्या क्यूट पोस्टद्वारे आर्यनवरचे तिचे प्रेम व्यक्त केले. आता अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्ह्याराल होतं आहे.

Aryan Khan
Upcoming Marathi Movies: आगामी वर्षात प्रेक्षकांसाठी खास भेट; वेगवेगळ्या धाटणीच्या सात चित्रपटांची घोषणा

सजल अली ही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २०१६ मध्ये 'जिंदगी कितनी हसीन है' या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. सजलने बॉलिवूड चित्रपट 'मॉम'मध्ये काम केले आहे. या चित्रपटात तिने श्रीदेवीच्या मुलीची 'आर्या'ची भूमिका साकारली होती. याशिवाय सजलने २०२० मध्ये तिचा बॉयफ्रेंड अहद रझा मीरसोबत लग्न केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com