'पुष्पा: द रुल' या चित्रपटाची स्टोरी झाली लीक; श्रीवल्लीचा...

निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग 'पुष्पा: द रुल'च्या चित्रीकरणाची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी सांगितले की, या चित्रपटाचे चित्रीकरण हे यावर्षी ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
'पुष्पा: द रुल' या चित्रपटाची स्टोरी झाली लीक; श्रीवल्लीचा...
pushapa 2 upcoming moviesaam tv

मुंबई : साऊथचे सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा: द राइज'(pushpa the rise) हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रचंड गाजला. चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही लोकांच्या ओठावर आहेत. अलीकडेच, निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग 'पुष्पा: द रुल'च्या चित्रीकरणाची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी सांगितले की, या चित्रपटाचे चित्रीकरण हे यावर्षी ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. मात्र चित्रीकरणापूर्वीच चित्रपटाची कथा लीक झाली आहे. यानुसार, चित्रपटातील रश्मिका मंदानाची म्हणजेच श्रीवल्लीची व्यक्तिरेखा खूपच कमी करण्यात आली आहे.

pushapa 2 upcoming movie
TMKOC : दयाबेनची एन्ट्री पुन्हा लांबणीवर; 'ती' बातमी केवळ अफवा! राखीने स्वतः केला खुलासा

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, 'पुष्पा: द रूल'मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये फहाद फासिल या अभिनेत्याची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. सोशल मीडियावर नेटकरी फहाद आणि रश्मिका यांच्या भूमिकांविषयी अनेक तर्क लावत आहेत. या चित्रपटातील खलनायकाचे पात्र साकारणारा अभिनेता फहाद फासिल हाच राश्मिकाची म्हणजे श्रीवल्लीची हत्या करतो, असे तर्क नेटकरी लावत आहेत. श्रीवल्लीच्या मृत्यूचा पुष्पराज बदला घेतो, असे बोलले जात आहे.

pushapa 2 upcoming movie
चुकीला माफी नाही! लवकरच 'दगडी चाळ 2' प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटाची कथा लीक झाल्याच्या वृत्तावर निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 'पुष्पा: द रुल'ची पटकथा सध्या लिहून झाली असून, सुकुमार आणि त्याच्या टीमने ऑगस्टमध्ये चित्रीकरण सुरू करण्याचे निश्चित केले आहे.

चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमार याची प्रकृती मधल्या काळात ठीक नसल्यामुळे तो चित्रपटाच्या कथा लेखनात सहभागी होऊ शकला नव्हता. परंतु तरीही 'पुष्पा २' या चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल दिग्दर्शक सुकुमार याला प्रचंड आत्मविश्वास होता. म्हणूनच निर्मात्यांनी या चित्रपटची कथा वाचताच काही महिन्यातच चित्रपट प्रदर्शित करण्याचे घोषित केले. हा चित्रपट सर्व सीमा पार करेल आणि आंतरराष्ट्रीय हिट ठरेल, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

अल्लू अर्जुन या चित्रपटात सर्व अडचणींशी लढताना दाखवण्यात येणार आहे. 'पुष्पा २'मध्ये फहाद फासिल महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुनची बॉलिवूडमधील लोकप्रियता गगनाला भिडली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com