Dream Girl 2 Release Date: ईदच्या दिवशी पुन्हा होणार आयुष्मान खुरानाच्या पूजाची एन्ट्री

आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल २' सिनेमाची रिलीज डेट मजेदार पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे.
Dream Girl 2
Dream Girl 2Saam Tv

मुंबई : बॉलिवूडचा मल्टी टॅलेंटेड अभिनेता आयुष्मान खुरानाचे(Ayushmann Khurrana) चित्रपट नेहमी वेगवेगळ्या विषयांवर आधारित असतात. प्रत्येक वेळी आयुष्मान त्याच्या चित्रपटांमधून एक सामाजिक संदेश देतो, त्याचे चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. असाच एक चित्रपट म्हणजे 'ड्रीम गर्ल २'(Dream Girl 2) , ज्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती आणि आता त्याची रिलीज डेट देखील मजेदार पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे. आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल २' पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Dream Girl 2
Vaibhav Mangle: 'ती मी नाहीच' वैभव मांगलेने 'अलबत्या गलबत्या' नाटकाला केले रामराम

२०१९ मध्ये, आयुष्मान खुराना 'ड्रीम गर्ल' घेऊन आला आणि या चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले. प्रेक्षकांना या चित्रपटाच्या कथेपासून आयुष्मानच्या अभिनयापर्यंत सर्व काही आवडले आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. गेल्या एक वर्षापासून 'ड्रीम गर्ल २' बद्दल बरीच चर्चा सुरु होती. आता हा चित्रपट चित्रपट ईदला म्हणजेच २९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये चित्रपटाचे प्रमोशन, रिलीज डेट आणि फीमेल लीडचीही अनोख्या पद्धतीने घोषणा करण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये अनन्या पांडे 'ड्रीम गर्ल २' मध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याची पुष्टीही करण्यात आली आहे. यापूर्वी ड्रीम गर्लमध्ये मुख्य भूमिका नुसरत भरुचाने साकारली होती.

केवळ अनन्या पांडेच नाही तर इतर अनेक नवे चेहरेही या चित्रपटात दिसणार आहेत. असरानी, ​​परेश रावल, सीमा पाहवा, मनोज जोशी, राजपाल यादव अनु कपूर आणि मनजोत सिंग चित्रपटात त्यांच्या विनोदाची भर घालणार आहेत. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मानच्या चित्रपटाने २०० कोटींचा व्यवसाय केला. जो खरोखरच आश्चर्यकारक आकडा होता. त्यामुळे या प्रोमोवरून स्पष्ट होते की काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com