Waat Laga Denge Song Out: 'वाट लगा देंगे' गाणं आलं रे; विजय देवरकोंडाचा सॉलिड आवाज

साउथचा सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या 'लाइगर' या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'लाइगर' या सिनेमातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Waat Laga Denge Song Out
Waat Laga Denge Song OutSaam Tv

मुंबई : नॅशनल क्रश असलेला साउथचा सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Devarakonda) सध्या त्याच्या 'लाइगर'(Liger) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'लाइगर' या सिनेमातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'लाइगर' या सिनेमात विजय देवरकोंडासोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandy) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आज 'लाइगर' या सिनेमात जबरदस्त अॅक्शनमध्ये दिसणार्‍या विजयचे दुसरे गाणे 'वाट लगा देंगे' रिलीज झाले आहे. या गाण्यात विजय देवरकोंडा बॉक्सिंग रिंगमध्ये आपल्या हटके स्टाईलमध्ये दिसत आहे.

Waat Laga Denge Song Out
Video: तेजस्वी प्रकाशच्या मालिकेमधील डायलॅागवर जान्हवी कपूरने केला मजेदार व्हिडीओ

'लाइगर' सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमाशी संबंधित अपडेट्स दररोज समोर येत आहेत. आज या सिनेमाचे आणखी एक गाणे रिलीज झाले आहे. 'वाट लगा देंगे' हे आज रिलीज झालेलं गाण स्वतः विजय देवराकोंडाने गायले आहे. त्याचबरोबर सुनील कश्यपने या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणे हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे. गाण्यात विजय देवरकोंडा जबरदस्त स्टाइलमध्ये पाहायला मिळत आहे.

Waat Laga Denge Song Out
Koh-i-Noor | कोहिनूरच्या हिऱ्याबाबत उलगडणार अनेक रहस्य; डिस्कव्हरी+ वर येतेय भन्नाट डॉक्युसिरीज

'लायगर' मधील 'वाट लगा देंगे' या गाण्यात विजय देवराकोंडाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. १ मिनिट २६ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये विजयचा स्ट्रीट फायटरपासून ते राष्ट्रीय खेळाडू हा प्रवास दाखवण्यात आला आहे. प्रेक्षकांकडून या गाण्याला भरभरून प्रेम मिळत आहे. विजय या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार आहे, तर अनन्या पांडे या सिनेमाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीकडे वाटचाल करत आहे. या सिनेमातून विजय देवकोंडाचे अनेक लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

'लायगर' हा सिनेमा हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अमेरिकन बॉक्सर माइक टायसनचीही या सिनेमात छोटी भूमिका आहे. सिनेमात विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, माइक टायसनसोबत अभिनेत्री रम्या कृष्णन विजयच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'लायगर' हा सिनेमा २५ ऑगस्ट २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com