Criminal Justice 3 Teaser: पंकज त्रिपाठी पुन्हा लढणार नवीन केस, श्वेता बसूसोबत कोर्टात करणार वादविवाद!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांची प्रसिद्ध वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस' च्या तिसऱ्या सीझनचा टीझर लाँच झाला आहे.
Criminal Justice 3
Criminal Justice 3 Saam Tv

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी(Pankaj Tripathi) यांची प्रसिद्ध वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'(Criminal Justice) च्या तिसऱ्या सीझनचा टीझर लाँच झाला आहे. हा टीझर सस्पेन्सने भरलेला असून पंकज त्रिपाठी आपल्या जुन्या शैलीत एक नवीन केस लढताना या टीझरमध्ये दिसत आहेत. या सीरीजमध्ये पंकज त्रिपाठी वकील माधव मिश्रा यांची भूमिका साकारत आहे. टीझरची सुरुवात माधवच्या घरापासून होते, जिथे एक महिला त्याच्याकडे मदत मागण्यासाठी जाते. यानंतर कोर्टरूमची एक झलक दाखवण्यात आली आहे. या सीरीजमध्ये श्वेता बसू प्रसाद वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. या सीरीजमध्ये पंकज आणि श्वेता वकील म्हणून एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहेत.

Criminal Justice 3
Salman Bulletproof Car : सलमान खानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार , किंमत ऐकून बसेल धक्का !

'क्रिमिनल जस्टिस: अधुरा सच'ही वेब सीरीज रोहन सिप्पीने दिग्दर्शित केली असून या सीझनची थीम अपूर्ण सत्यावर आधारित आहे. या सीरीजचे मागील दोन्ही सीझन सुपरहिट झाले होते. म्हणूनच आता निर्माते या वेब सीरीजचा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित करणार आहेत. या सीझनचा टीझर प्रदर्शित होताच चाहते या 'क्रिमिनल जस्टिस: अधुरा सच' च्या आगामी सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

एका मुलाखतीत 'क्रिमिनल जस्टिस: अधुरा सच' या सीरीजमधील पंकज त्रिपाठी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाले, 'नवीन सीझनमध्ये, माधव मिश्रा एक नवीन साहस करतो, तो आपल्या कायद्यांच्या मर्यादांवर प्रश्नचिन्ह या सीझनमध्ये उपस्थित करतो. माधव मिश्रा त्यांच्या क्लायंटला कायदेशीर लढाईत जीवाच्या आकांताने मदत करताना प्रेक्षकांना या सीझनमध्ये दिसणार आहे'. त्याचबरोबर या वेब सीरीजचे दिग्दर्शक रोहन सिप्पी म्हणाले, "यावेळी माधव मिश्राने आपल्या कायदेशीर व्यवस्थेची यापूर्वी कधीही न पाहिलेली बाजू उघड करून न्यायव्यवस्था आणि तिच्या मर्यादांवर प्रेक्षकांना विचार करायला भाग पडणारा आहे.

Criminal Justice 3
Suhana Khan Video : शाहरुख खानची मुलगी सुहाना रात्री उशिरा 'या' मुलासोबत, काय आहे नेमकं प्रकरण?

'क्रिमिनल जस्टिस' या सिरीजच्या पहिल्या सीझनबद्दल बोलयचे झाले तर, पहिल्या सीझनमध्ये विक्रांत मॅसी आणि जॅकी श्रॉफसारखे मोठे स्टार्स होते. तसेच अनुप्रिया गोएंकाही वकिलाच्या भूमिकेत दिसली होती. या सिरीजच्या पहिल्या सीझनची थीम एका निरपराध कैद्याच्या सुटकेवर आधारित होती.

'क्रिमिनल जस्टिस सीझन २' ची थीम 'बिहाइंड क्लोस्ड डोअर्स'वर आधारित होती. यामध्ये पंकज त्रिपाठीसोबत पुन्हा अनुप्रिया गोएंकाही वकिलाच्या भूमिकेत दिसली होती. या सीझनमध्ये कीर्ती ही पंकजची क्लायंट होती. क्रिमिनल जस्टिस बिहाइंड क्लोस्ड डोअर्स डिसेंबर २०२० मध्ये रिलीज झाला होता. आता सीझन ३ मध्ये काय दाखवणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com