Baramati News: 'माझ्या कार्यक्रमाला कायमच टार्गेट केलं जातं', असं का म्हणाली गौतमी पाटील?

Gautami Patil News: गौतमीचा बारामतीमध्ये कोणताही राडा आणि गोंधळ न घालता अगदी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला.
Gautami Patil News
Gautami Patil NewsInstagram

Gautami Patil News

गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की, वाद- विवाद, धडाकेबाज डान्स आणि राडा हे समीकरण आपल्याला कायमच पाहायला मिळतं. आता गौतमीची क्रेझ फक्त खेड्यापाड्यातच नाही तर, शहरांतही पाहायला मिळत आहे. दहीहंडीवेळी गौतमीचा मुंबईमध्ये कार्यक्रम झाला होता, त्यावेळी सुद्धा प्रचंड राडा झालेला आपण पाहिला. नुकतंच गौतमीचा कार्यक्रम बारामतीमध्ये पार पडला. विशेष म्हणजे, यावेळी कार्यक्रमामध्ये कोणताही राडा आणि गोंधळ न घालता अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. बारामती तालुक्यातल्या झारगडवाडीमध्ये कार्यक्रम निर्विघ्न पार पडल्यामुळे गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.

Gautami Patil News
Bharati Singh Fell Off The Bed: मोबाइल पाहण्यात इतकी गुंतली की थेट बेडवरूच पडली; प्रसिद्ध अभिनेत्रीला दुखापत

बारामतीतील झारगडवाडी येथे शुक्रवारी पार्थ पवार युथ फाउंडेशनच्या वतीने दहीहंडीनिमित्त गौतमी पाटीलच्या डान्सचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीप्रमाणे गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यावर शेजारच्या गावातल्या लोकांनीही प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मेखळीतील भैरवनाथ दहीहंडी संघाने येथील दहीहंडी फोडली. गावकऱ्यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे, उपस्थितांनी दिलेल्या सहकार्यामुळे आणि सर्वांनी शिस्तीचे पालन केल्यामुळे झारगडवाडीतील कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध झाला. गौतमीने आयोजकांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले असून मला कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया गौतमी पाटीलने प्रसार माध्यमांना दिली.

Gautami Patil News
IAS Tina Dabi: IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई; जयपूरच्या रुग्णालयात दिला गोंडस बाळाला जन्म

एकंदरीतच कार्यक्रमाविषयी गौतमी बोलली, “झारगडवाडी येथे पार्थ पवार युथ फाउंडेशनच्या वतीने दहीहंडीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन खूपच उत्तमरित्या करण्यात आलं होतं. अगदी कार्यक्रम शिस्तप्रिय झाल्यामुळे मला कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. उपस्थितांनीही कोणत्याही प्रकारचा गोंधळ न घातल्यामुळे कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. माझा कार्यक्रम म्हटलं की, गोंधळ आणि राडा होतोच असं काही नाही. पण काही अपवाद सोडले तर, माझे कार्यक्रम सुरळीत पार पडले आहेत. माझ्या कार्यक्रमाला कायमच टार्गेट केलं जातं. माझ्या प्रत्येक कार्यक्रमात असं घडत नाही.”

घुंगरू चित्रपटाचे प्रदर्शन येत्या काही दिवसात असून चित्रपट प्रेक्षकांनी पहावा. लवकरच चित्रपटातील आणखी एक गाणं सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हे गाणं प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार असल्याची प्रतिक्रिया गौतमी पाटीलने दिली आहे.

Gautami Patil News
Neeta Ambani Dance: दीपिका पदुकोणच्या गाण्यावर थिरकल्या नीता अंबानी, जबरदस्त डान्सचा VIDEO होतोय व्हायरल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com