अभिनेता राजकुमार राव म्हणाला, 'बॉलिवूडमध्ये नेपोटिझम कायमच राहील, पण...

राजकुमार राव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, बॉलिवूड इंडस्ट्रीत नेहमीच नेपोटिझम असेल. यासोबतच टॅलेंट आणि कामाला वाव मिळेल असेही तो म्हणाला. त्याने सांगितले की त्याचे मित्र प्रतीक गांधी आणि जयदीप अहलावत यांना ओटीटीकडून ओळख मिळाली.
Rajkummar rao, Bollywood News Today, Latest Marathi News, Latest Bollywood News
Rajkummar rao, Bollywood News Today, Latest Marathi News, Latest Bollywood NewsSaam Tv

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) सध्या त्याच्या आगामी सायकोथ्रिलर चित्रपट 'हिट: द फर्स्ट केस'(HIT: The First Case) मुळे चर्चेत आहे. यामध्ये राजकुमारसोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. परंतु चित्रपट रिलीज होण्याआधी राजकुमारने बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिझमबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. इंडस्ट्रीत कायम नेपोटिझम राहील, असे त्याने म्हटले आहे. राजकुमार रावने असेही सांगितले की, नेपोटिझम अस्तित्वात आहे, परंतु इंडस्ट्रीत अनेक संधीही आहेत. तो त्याच्या मित्रांबद्दल जयदीप अहलावत आणि प्रतीक गांधी यांच्याबद्दल ही बोलला. ज्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे आपली ओळख निर्माण केली आहे. (Latest Bollywood News)

Rajkummar rao, Bollywood News Today, Latest Marathi News, Latest Bollywood News
न्यासाचा ग्लॅमरस लूक बघून फॅन्सचा 'याड लागलं...' , कोण आहे जाणून घ्या!

राजकुमार राव एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम नेहमीच असेल, पण आता अनेक संधी आहेत. माझे असे अनेक मित्र आहेत ज्यांना आता ओळख मिळत आहे. यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे आभार मानले पाहिजेत. जयदीप अहलावत ज्याने 'पाताल लोक'मध्ये काम केले आहे. त्याचबरोबर प्रतीक गांधी आहे ज्याने 'स्कॅम १९९२' मध्ये चांगले काम केले. नेपोटिझम असेल, पण तुमचे काम, तुम्ही किती योग्य आहात हे दाखवून देईल'.

Rajkummar rao, Bollywood News Today, Latest Marathi News, Latest Bollywood News
खुदा हाफिज- २च्या निर्मात्यांनी मागितली माफी, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?

राजकुमार रावने हिट चित्रपटांबद्दलही सांगितले. तो म्हणाला, 'हिट चित्रपटाचा फॉर्म्युला कोणालाच कळत नाही, तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागते आणि मग नशिबावर सोडावे लागते. साऊथचे चित्रपट चांगले का चालतात, कारण ते चित्रपट तेवढे चांगले असतात आणि त्यासाठी खूप मेहनतही घेतली जाते'.

राजकुमार राव पुढे म्हणाला, 'पण माझा विश्वास आहे की सिनेमा अनेक टप्प्यांतून जातो, एक अभिनेता म्हणून मला माझ्या कामाचा अभिमान वाटेल असेच चित्रपट मी नेहमी करेन. मग माझ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली नाही तरी काही फरक पडत नाही'.

राजकुमार रावने २०१० मध्ये 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. परंतु 'गँग्स ऑफ वासेपूर-२' आणि 'तलाश: द आन्सर लाईज विदिन' मधील सहाय्यक भूमिकांद्वारे त्याला ओळख मिळाली. त्याने 'काई पो चे', 'शाहिद', 'क्वीन', 'बरेली की बर्फी', 'अलिगढ', 'लुडो', 'न्यूटन', 'द व्हाइट टायगर' आणि 'स्त्री'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमारला 'शाहिद' या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. (Bollywood News In Marathi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com