OTT वर चित्रपट आणि वेब सीरीजची या आठवड्यात मेजवानी; पहा यादी

या आठवड्यात नेटफ्लिक्स आणि Zee 5 सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म वेब सिरीज आणि चित्रपटांनी भरलेले असणार आहेत.
OTT वर चित्रपट आणि वेब सीरीजची या आठवड्यात मेजवानी; पहा यादी
OTT वर चित्रपट आणि वेब सीरीजची या आठवड्यात मेजवानी; पहा यादीSaam Tv

Mumbai Diaries 26/11: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 26/11 च्या हल्ल्यावरील 'मुंबई डायरीज 26/11' ही वेब सीरिज 9 सप्टेंबरला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. कोंकणा सेन शर्मा आणि मोहित रैना यात मुख्य भूमिका साकारताना दिसतील.

हे देखील पहा-

'Untold: Breaking Point: ब्रेकिंग पॉइंट' ही टेनिसपटू मार्डी फिशची कथा आहे. 2012 च्या यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला एंग्जाइटी डिसऑर्डर असल्याचे उघड झाले होते. मानसिक आरोग्यावरील ही सिरीज 7 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

'J J+E': हा सामाजिक विषयांवर बनलेला चित्रपट आहे. मॅट वॉलच्या कादंबरीच्या या नवीन रुपांतरमध्ये स्टॉकहोममधील दोन किशोरवयीन तरुण प्रेमात पडले आहेत जे वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक वातावरणाशी संबंधित आहेत. हा चित्रपट 8 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

OTT वर चित्रपट आणि वेब सीरीजची या आठवड्यात मेजवानी; पहा यादी
Maharashtra Weather: IMD कडून 4 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

'Into The Night Season 2': ही एक साइंस फिक्शन नॉवेल आधारित सिरीज आहे. 8 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर याचे प्रीमियर होईल.

'Lucifer 6': 10 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा 6 वा सिझन आहे. यापूर्वी पाच सीझनच्या यशानंतर प्रेक्षक सहाव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु कदाचित, Lucifer हा या सिरीजचा हा शेवटचा सीझन असू शकतो.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com