
Pathan Movie Producer New Strategy: जगभरात 'पठान' चित्रपटाने घवघवीत यश मिळवले आहे. अनेक वादानंतर चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. शाहरुख खान दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.
'पठान' चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. केजीएफ आणि दंगल चित्रपटाचे रेकॉर्ड 'पठान' चित्रपटाने मोडले आहेत. लवकरच हा चित्रपट 'बाहुबली २' चा रेकॉर्ड मोडेल असे म्हटले जात आहे. यासाठीच चित्रपटाचे निर्माते नवनवीन युक्त्या करत आहेत.
भारतात तसेच परदेशात निर्मात्यांनी 'पठान डे'ची घोषणा केली होती. 'पठान डे' निमित्त चित्रपटाच्या तिकीटाची किंमत ११० रुपये करण्यात आली होती. 'पठान डे' मिळालेला प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी आणखी एक घोषणा केली आहे. पुन्हा एकदा निर्मात्यांनी 'पठान' चित्रपटाचे तिकिटाची किंमत कमी केली आहे. यावेळी तिकिटाची किंमत ११० रुपये नसून २०० रुपये असणार आहे. पण हे चित्रपटाचे हे दर कधी लागू होतील हे सांगण्यासाठी यशराज फिल्म्सने ट्विट केले आहे.
यशराज फिल्म्सने याविषयी माहिती देण्यासाठी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील तिन्ही कलाकार या ऑफरबद्दल सांगत आहेत. व्हिडिओतील माहितीनुसार या वीकएंडला पीव्हीआर, सिनेपोलिस आणि आयनॉक्स 'पठान' चित्रपट २०० रुपयात पाहायला मिळणार आहे.
यशराज फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले आहे, #PathaanDayला मिळालेल्या प्रचंड प्रेमामुळे, तुमच्यासाठी काही खास आहे. #पठानची तिकिटे या वीकएंडला मिळणार फक्त 200/- रूपयात.
शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम अभिनीत या चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 2.50 कोटींची कमाई केली आहे. या अॅक्शन ड्रामा चित्रपटाने आतापर्यंत भारतात एकूण 508.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता या ऑफरमुळे चाहते 'पठान'वर किती प्रेमाचा वर्षाव करतात हे पाहावे लागेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.