
मुंबई: प्रसिद्ध टीव्ही होस्ट, बॉलीवूड अभिनेता आणि माजी बिग बॉस स्पर्धक जय भानुशालीची पत्नी माही विज हिला रस्त्यावर बलात्काराची उघड धमकी (Threat) मिळाली आहे. जयची पत्नी स्वतः एक अभिनेत्री (Actress) आहे, पण लग्नानंतर तिने अभिनय करणे सोडून दिले आहे, आणि मुलांचे संगोपन सुरू केले. परंतु, ती सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून आपली उपस्थिती नोंदवत असते.
हे देखील पाहा-
माहीने व्हिडिओ शेअर केला आहे
अभिनेत्री माही विजने नुकताच तिच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ (Video) शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले की, एका व्यक्तीने तिला मध्येच थांबवले आणि तिला शिवीगाळच केली, नाहीतर बलात्काराची धमकीही दिली आहे. त्याने या व्हिडिओमध्ये मुंबई (Mumbai) पोलिसांनाही टॅग केले असून स्वत:साठी मदतीची याचना केली आहे. माही विजचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबई पोलिसांकडून मदत मागितली
माही विजने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये फक्त एक वाहनाची नंबर प्लेट दिसत असून काही लोकांचा आवाज येत आहे. हा व्हिडिओ फक्त ४ सेकंदांचा आहे. अभिनेत्रीने मुंबई पोलिसांना टॅग करत म्हटलं आहे की, आम्हाला धमकी देणाऱ्या या व्यक्तीला शोधण्यात मला मदत करा. माहीच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनी उत्तर दिले आहे. तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देत तक्रार नोंदवा, असे त्यांनी लिहिले आहे.
माही विज आणि जय भानुशाली हे टेलिव्हिजन जगतातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर जोडपे मानले जाते. माही विज लग्नानंतर टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर होती, पण तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. याशिवाय कलर्सच्या 'लागी तुझसे लगन' आणि 'नकुशा' या शोमधून तिला खरी ओळख मिळाली. माही विजने 'झलक दिखला जा-४' आणि 'नच बलिए-५' मध्ये देखील भाग घेतला आहे आणि आता ती लवकरच 'बिग बॉस १६' मध्येही दिसणार असल्याचे समजत आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.