Swara Bhaskar : अभिनेत्री स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी; वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Swara Bhaskar Threat Letter News : अभिनेत्री स्वराला तिच्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले आहे, ज्यामध्ये स्वराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Swara Bhasker receives death threat, Mumbai Police launches probe, Bollywood News in Marathi
Swara Bhasker receives death threat, Mumbai Police launches probe, Bollywood News in MarathiInstagram/reallyswara

मुंबई: अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. वडील सलीम खान यांना ५ जून रोजी सकाळी मिळालेल्या पत्राद्वारे अभिनेत्याला ही धमकी (Threat) देण्यात आली होती. या बातमीने सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. सलमान खाननंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीची दमदार अभिनेत्री स्वरा भास्करलाही (Swara Bhaskar) जीवे मारण्याची धमकी आली आहे. अभिनेत्री स्वराला तिच्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले आहे, ज्यामध्ये स्वराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Swara Bhaskar Threat Letter News)

हे देखील पाहा -

हिंदीत लिहिलेल्या या पत्रात स्वरा भास्करला थेट हत्या करण्याची धमकी दिली आहे. "वीर सावरकरांचा अपमान करणे थांबवा आणि फक्त आपल्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करा असा इशारा या अभिनेत्रीला देण्यात आला आहे. या पत्रात पाठवणाऱ्याचे नाव लिहिलेले नाही. मात्र हे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला देशातील तरुण असल्याचे सांगितले आहे. पत्रात लिहिले आहे की, "तुमच्या भाषेवर संयम ठेवा... वीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही. तुमचा चित्रपट आरामात बनवा नाहीतर अंत्यविधी होईल. या देशातील तरुण असं या पत्रात लिहिलं आहे. याबाबत स्वराने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Swara Bhasker receives death threat, Mumbai Police launches probe, Bollywood News in Marathi
Ashadhi Wari 2022 : तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत उत्साहात संपन्न

स्वरा भास्कर नेहमीच देशातील राजकीय मुद्द्यांवर खुलेपणाने बोलताना दिसली आहे. तिच्या वक्तव्यावरून अनेकदा गदारोळ झाला आहे, पण तरीही ती न घाबरता प्रत्येक मुद्द्यांवर आपले मत मांडताना दिसते. स्वराने वीर सावरकरांबाबत अनेक ट्विटही केले होते. 2017 मध्ये, अभिनेत्रीने एक ट्विट केले होते ज्यात लिहिले होते, 'सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली. तुरुंगातून बाहेर पडण्याची भीक मागितली! तो 'वीर' नक्कीच नाही. असे आणखी ट्विट अभिनेत्रीने केले आहेत. काल, बुधवारी रात्री स्वरा भास्करनेही उदयपूर हत्याकांडावर ट्विट करून संताप व्यक्त केला होता. त्यांनी लिहिले, 'अतिशय निंदनीय... कायद्यानुसार गुन्हेगारांवर तात्काळ आणि कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्वराने केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com