Tiger Shroff-Disha Patani Breakup : टायगर श्रॉफ- दिशा पाटनीचा ब्रेकअप, ६ वर्षे डेटिंगनंतर 'का रे दुरावा'

बॉलिवूडची फिटनेस क्वीन दिशा पाटनी आणि अॅक्शन किंग टायगर श्रॉफ यांच्या नात्यात दुरावा आल्याचे वृत्त आहे.
Tiger Shroff-Disha Patani Breakup News
Tiger Shroff-Disha Patani Breakup NewsSAAM TV

मुंबई: बॉलिवूड जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. 'अॅक्शन' स्टार टायगर श्रॉफ आणि फिटनेस क्वीन दिशा पाटनी यांचा ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. टायगर आणि दिशा हे चंदेरी दुनियेतील फेमस कपल आहे. हे दोघे अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसले आहेत. पण आता हे दोघेही कपल म्हणून एकत्रित दिसणार नाहीत. ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, असे बोलले जाते. (Tiger Shroff-Disha Patani Breakup News)

Tiger Shroff-Disha Patani Breakup News
Swapnil Joshi : मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशी स्टाइलमध्ये देतोय बॉलिवूड अभिनेत्याला टक्कर, पाहा कड्डक लूक

दिशा पाटनी (Disha Patani) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) या बॉलिवूडमधील कपलविषयी मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, दिशा-टायगर हे दोघे सहा वर्षांनंतर वेगळे होणार आहेत. त्यांच्यातील प्रेमात दुरावा निर्माण झाला आहे. दिशा आणि टायगर यांच्यात नेमके असे काय झाले, की त्यांनी प्रेमाचं नातं संपुष्टात आणण्याचा विचार केला.

रिपोर्टनुसार, दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांच्यात गेल्या वर्षभरापासून बिनसलं आहे. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र, कधीच त्यांनी याबाबत मीडियासमोर किंवा इव्हेंटमध्ये जाहीरपणे सांगितले नाही. (Bollywood News)

दिशा आणि टायगरने नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय का घेतला किंवा त्यांच्यात नेमके काय झाले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका मुलाखतीत टायगरच्या जवळच्या एका मित्राने या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Tiger Shroff-Disha Patani Breakup News
Rakhi Sawant : राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका! ट्रॅफिक जाम करणे पडले महागात

टायगरच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, ब्रेकअप झाल्यानंतरही टायगरच्या कामात कुठलाही फरक पडलेला नाही. तो आधीप्रमाणेत आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. टायगर सध्या लंडनमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

दिशा पाटनी 'एक विलेन रिटर्न्स' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर टायगर श्रॉफ 'गणपत' आणि 'बागी-4' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. दिशा आणि टायगर यांच्यात प्रेमाचं नातं आता संपुष्टात आलं असलं तरी, ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आता दिशा आणि टायगर ब्रेकअपच्या वृत्ताबाबत आपली काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com