Video: ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच दिशा पटानी टायगर श्रॉफला म्हणाली, मला सुद्धा...

बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आले आहेत.
Disha Patni and Tiger Shroff
Disha Patni and Tiger ShroffSaam Tv

मुंबई: बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री दिशा पटानी(Disha Patani) आणि टायगर श्रॉफ(Tiger Shroff) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आले आहेत. त्या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा झोडल्या जात आहेत. नुकताच टायगरने सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. टायगरच्या या व्हिडिओवर दिशाने खुलासा केला आहे. जे एकून त्यांचे चाहते देखील चक्रावून गेले आहेत. यामुळेच आता दोघांबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

Disha Patni and Tiger Shroff
Urvashi Rautela 'या' ड्रेसमध्ये दिसतेय खूपच बोल्ड; सगळ्यांच्या नजरा या 'हसींना'वर खिळल्या

टायगर श्रॉफने स्वतःचा एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये टायगर मार्शल आर्टमध्ये शानदार कामगिरी करताना दिसतो आहे. टायगर त्याच्या पार्टनरसोबत किकबॅाक्सिंग करत आहे. या दरम्यानचा टायगरने त्याचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज मला ट्रेनिंग घ्यावीशी वाटत नव्हती.... त्यामुळे मुलांनी किकबॅाक्सिंग करण्याचा निर्णय घेतला... ही माझी कल्पना नव्हती'. यासोबत 'ह्युमनपंचिंगबॅग' आणि 'गुडनाईट' असे हॅशटॅग केले आहेत.

Disha Patni and Tiger Shroff
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: हातात हातकडी, नजरेत निराशा; नक्की कोणत्या गुन्ह्याची जेठालालला मिळते शिक्षा?

टायगर श्रॉफच्या या जबरदस्त मार्शल किकमुळे अवाक् झाले आहेत. टायगरच्या व्हिडिओवर नेटिझन्स कमेंट करत आहेत. दिशा पटानीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिशा पटानीने प्रतिक्रियेत 'मला सुद्धा हे करायचे आहे' असे म्हटले आहे.

दिशाने प्रतिक्रिया देताच चाहतेही आनंदी झाले. चाहत्यांना अद्यापही हे दोघे एकत्र असल्याचे वाटत आहे. तिच्या या कमेंटवर चाहते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका यूजरने "मॅडम, यासाठी तुम्हाला टायगर सरांसोबत ट्रेनिंगला जावं लागेल" असा थेट सल्ला दिला आहे, तर आणखी एकाने "टायगरसोबत ब्रेकअप करू नका, तो खूप चांगला आहे" तर एका यूजरने त्यांना दोघांना एकत्र राहावे, अशी विनंती केली आहे. शिवाय छोटी आहेस का? असे एका यूजरने म्हटले. 'एक व्हिलन' कडे लक्ष केंद्रीत असू दे, असे कमेंटमध्ये म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com