Bigg Boss 16 Contestant: 'बिग बॉस'च्या घरामध्ये टीना दत्ताला बसला होता मोठा धक्का, बाहेर पडताच केला खुलासा

टीनाला फिनालेमध्ये पाहण्याची इच्छा असणारे अनेक फॅन्स निराश झाले आहेत.
Tina Datta
Tina DattaInstagram @tinadatta

Tina Datta Get Evicted From Bigg Boss 16: हिंदी 'बिग बॉस १६' मधून टीना दत्ता बाहेर गेली आहे. शनिवारी टीनाचे एव्हिक्शन दाखविण्यात आले. टीना फिनालेच्या दोन आठवडे आधी घराबाहेर गेली आहे. टीनाला फिनालेमध्ये पाहण्याची इच्छा असणारे अनेक फॅन्स निराश झाले आहेत.

टीना दत्ताने अखेर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. फायनलिस्ट होण्याचे तिचे स्वप्न जरी हुकले असले तरी बाहेर पडून टीना खूप आनंदी असल्याचे म्हणत आहे. टीना दत्ताने शालानी भानोतसोबतचे नाते, प्रियांकाशी असलेल्या मैत्रीबद्दल खूप काही सांगितले आहे.

Tina Datta
Ranbir Kapoor Viral Video: अखेर रणबीर कपूरच्या 'त्या' व्हिडिओ मागील सत्य आले समोर

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत टीना म्हणाली की, तिचा बिग बॉसमधील प्रवास कठीण होता. यादरम्यान तिला चांगले-वाईट असे दोन्ही अनुभव आले. टीना म्हणाली, 'मी बिग बॉस 16 मध्ये बराच काळ राहिले. मी स्वत:ला सांगायचो की मी सर्वाइव्हल आहे. मी घरात असताना माझा कुत्रा गमावला. तो माझ्या मुलासारखा होता. सर्व 'वीकेंड वार' भागात माझीच चर्चा व्हायची. मला दुखापत सुद्धा झाली. त्यानंतर माझ्या दातांनाही मला त्रास द्यायला सुरूवात केली होती.

टीना म्हणाली की, शालीन भानोतच्या टॉपिकने माझ्यावर खोलवर परिणाम झाला. अलीकडे जेव्हा माझी प्रियांकाशी मैत्री झाली तेव्हा फराह मॅमने आम्हा दोघांना मतलबी म्हटले आणि प्रेक्षक आम्हा दोघींचा खूप तिरस्कार करत असल्याचे सांगितले. तेव्हा बिग बॉसच्या घरात असताना मला याने धक्का बसला होता.

टीना दत्ताची बिग बॉसमध्ये असताना शेवटच्या दिवसांमध्ये प्रियंका चहर चौधरीसोबत चांगली मैत्री झालेली दिसली होती. दोघींमध्ये खूप चांगले बाँडिंग होते. त्यांचे बाँडिंग इतके चांगले झाले होते की शालीन आणि टीनाच्या भांडणातही प्रियांकाने टीनाची बाजू घेतली आणि तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या दोघींची बाँडिंग प्रेक्षकांनाही आवडली होती.

बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर टीना दत्ताने सांगितले की तिला प्रियांकाला ट्रॉफी जिंकताना बघायला आवडेल. इतकेच नाही तर प्रियांकाला ज्या नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आले आहे, ती तशी अजिबात नाही. प्रियंका ही एक अशी मैत्रीण आहे जी आपल्या मित्रांसाठी जीव द्यायला तयार असते. प्रियांकाने तिच्या स्वतःमध्ये अनेक बदल केले आहेत आणि पहिल्या दिवसापासून एकटीने खेळ खेळला आहे.

टीना दत्ता घराबाहेर आल्यानंतर, सुंबुल तौकीर खान, शालीन भानोत, शिव ठाकरे, प्रियांका चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि निम्रित कौर अहलुवालिया हे बिग बॉसमधील टॉप 7 स्पर्धक आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com