Dilip Joshi Threat: 'जो माझ्या जीवावर उठलाय त्याचं भलं होवो...' दिलीप जोशींनी मारेकऱ्यांवर व्यक्त केली प्रतिक्रिया

शिवाजी पार्क येथील दिलीप जोशी यांच्या घराबाहेर २५ लोक हत्यारे घेऊन उभे आहेत.
Dilip Joshi
Dilip JoshiSaam TV

TMKOC Actor Dilip Joshi Gets Life Threat: 'तारक मेहता का उलटा चष्मा' हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील पात्र आता अनेकांच्या घराघरात पोहचली आहेत आणि घरातील सदस्य झाली आहेत. अभिनेता दिलीप जोशी यांची फॅन फॉलोविंग तुफान आहे.

दिलीप जोशीच्या संदर्भातील एका बातमीने त्यांच्या फॅन्सला चिंतेत टाकले आहे. एका अनोळखी व्यक्तीने नागपूर कंट्रोल रूमला फोन केला होता. फोन करून त्या अज्ञात व्यक्तीने सांगितले की, शिवाजी पार्क येथील दिलीप जोशी यांच्या घराबाहेर २५ लोक हत्यारे घेऊन उभे आहेत.

Dilip Joshi
Video : हार्ट अटॅकनंतर Sushmita Sen आली लाईव्ह, अभिनेत्रीची अवस्था पाहून लोक झाले भावुक

नागपूर कंट्रोल रूमने त्वरित याची माहिती शिवाजी पार्क पोलीस स्टेशन दिली. त्यानंतर पोलीस अलर्ट झाले. परंतु ही अफवा होती. दिल्लीतील एका नंबरवरून स्पूफ कॉल अँपच्या वापर करून कंट्रोल रूमला कॉल केला होता.

या प्रकरणावर आता अभिनेते दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांना प्रतिलारीया देताना दिलीप जोशी म्हणाले की, ''“ही बातमी खोटी आहे. असे काही घडले नाही. कुठून आणि कशी याची सुरुवात झाली ते मला देखील माहीत नाही. हे सरब गेले दोन दिवस सुरू आहे आणि हे ऐकून मला आश्चर्य वाटले.

ज्याने ही चुकीची बातमी पसरवली त्याच भलं होवो. माझी विचारपूस करण्यासाठी मला अनेक लोकांचे फोन आले. अनेक जुने मित्र आणि कुटुंबीयांनी फोन केले. ते पाहून आनंद झाला. लोक माझ्यावर किती प्रेम करतात हे मला कळले. अनेकांना माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी होती. हे पाहून आनंद झाला."

दिलीप जोशी पुढे म्हणाले की, “ही शॉकिंग आणि सरप्रायझिंग बातमी होती. आपण काही केले असते तर गोष्ट वेगळी होती, काहीही न करता अशा बातम्या येतात म्हणजे आश्चर्यच आहे.

दिलीप जोशी गेली ३४ वर्ष मनोरंजन विश्वात काम करत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेली १५ वर्ष ते 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये काम करत आहेत. २००८ साली ही विनोदी मालिका सुरू झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत दिलीप जोशींचं जेठालाल हे पात्र साकारत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com