
Monika Bhadoriya Shared Incident Happen With Munmun Dutta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील रोशन भाभी उर्फ जेनिफर मिस्त्रीने असित मोदींवर गंभीर आरोप करत शोमधून एक्झिट का घेतली हे सांगितले. त्यानंतर रिटा रिपोर्टर म्हणजे अभिनेत्री प्रिया अहुजा राजदाने देखील असित मोदींवर आरोप केले होते. आता मोनिका भदौरियानेही धक्कादायक दावा केला आहे.
याआधी तिने दिशा वाकानीबद्दल बरेच काही सांगितले होते. ती या शोमध्ये परत येणार नसल्याचे सांगितले. याचे कारण तिने निर्मात्याने तिच्याशी केलेले गैरवर्तन सांगितले आहे. आता मोनिकाने मुनमुन दत्ताविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बावरीची भूमिका करणाऱ्या मोनिका भदौरियाने तिच्या एका मुलाखतीत दावा केला आहे की, मुनमुन दत्ता जी बबिता ही भूमिका होती. तिचे निर्माते आणि असित मोदी यांच्यात बाचाबाची झाली. त्यांचे कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर तिने शो सोडला.
इतकंच नाही तर शोमधील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या पगारातील तफावतीवरही तिने मोनिकाने खुलासा केला आहे. तिने सांगितले की, अभिनेत्री आणि अभिनेते समान स्क्रीन वेळ देत आहेत आणि तरीही पुरुषांना जास्त पैसे दिले जातात.
मोनिका भदौरियाने 'न्यूज18'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मुनमुन दत्ताने शो सोडला नाही पण तिचा छळ झाला आणि त्यामुळे ती बराच वेळ सेटवर दिसली नाही. जेव्हा निर्माते कलाकारांना त्रास देतात.
तेव्हा कलाकार मालिकेकडे पाठ फिरवतात, परंतु नंतर त्यांना बोलावले जाते आणि गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. तिच्यासोबत (मुनमुन दत्ता) अनेक वाद झाले होते. अनेकदा वादानंतर ती सेटवरून निघून गेली आहे अनेक दिवस सेटवर शूटिंगसाठी आली नाही.
मोनिका भदौरियाने शोच्या निर्मात्यांवर पुरुष कलाकारांना जास्त मानधन देण्याचा आणि अभिनेत्रींना शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. ती म्हणाली, 'ते महिलांना महत्त्व देत नाहीत. जर एखाद्या महिला अभिनेत्रीचे शूट संपले तर ते तिला थांबण्यास सांगतात. ते आधी पुरुष कलाकारांचे शूटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काहीही झाले तरी त्यांच्या लेखी तिथल्या स्त्रियांची किंमत नाही.
मोनिका भदौरिया पुढे म्हणाली, 'पुरुष कलाकारांना जास्त मानधन दिले जाते. दोघांचाही स्क्रीन वेळ सारखा असला तरीही निर्माते अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना खूप कमी मानधन देतात. ते तेथील महिलांशी गैरवर्तन करतात. आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? ते काय म्हणतात ते मी सांगूच शकत नाही. इतकी घाणेरडी भाषा मी कधीच वापरू शकत नाही.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.