
मुंबई: छोट्या पडद्यावरील सोनी सबवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. शोच्या प्रत्येक पात्राची स्वतःचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला असला तरी, त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यामध्ये पोपटलालची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठकही प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. या मालिकेमुळे श्यामला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये पोपटलाल साकारणारा श्याम पाठक हा एक अनुभवी अभिनेता आहे. श्याम पाठक यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये छोटे छोटे पात्र साकारले आहेत. पण आता आम्ही आपल्याला अशी माहिती देणार आहोत, त्या गोष्टीवर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. श्याम उर्फ पोपटलालने हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, तर हा पाहा व्हिडीओ. त्यात अनुपम खेरसोबत श्याम पाठक दिसत असून व्हिडीओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता श्याम पाठकला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून अफाट लोकप्रियता मिळाली आहे. पण सोबतच त्याला खूप उत्तम भूमिका साकारल्या आहेत. हा व्हिडिओ हॉलिवूड चित्रपटातील छोटीशी क्लिप असून त्याचे नाव आहे - 'लस्ट कॉशन' जो एक चीनी चित्रपट आहे. हा चित्रपट २००७ या वर्षात प्रदर्शित झाला होता. व्हिडिओ स्वतः श्याम पाठकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
या व्हिडीओमध्ये श्याम पाठक अतिशय गंभीर अभिनय करताना दिसून येत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'पेक्षा ही भूमिका अतिशय वेगळी आहे. या व्हिडिओमुळे श्याम पाठक एक उत्कृष्ट अभिनेता असल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे. या व्हिडिओवर चाहते आणि सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. चाहत्यांनी श्याम पाठक याचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
Edit By- Chetan Bodke
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.