TMKOC: अखेर बबिताचं ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर
TMKOC: अखेर बबिताचं ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तरSaam Tv

TMKOC: अखेर बबिताचं ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेत "बबिता जी" अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता

तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेत "बबिता जी" अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी त्यांच्या विरोधामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रोलिंगला चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. माध्यमं आणि प्रेक्षकांना मुनमुन दत्तांनी खडे बोल सुनावले आहे. "बबिता जी" हे लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ता आणि "टप्पू" हे पात्र साकारणारा त्यांचा सहकारी अभिनेता राज अनाडकट यांच्या अफेअरला सुरूवात झाल्याची चर्चा मागील काही दिवस सोशल मीडियावर सुरू आहे. काही प्रसार माध्यमांमध्ये देखील या चर्चांना स्थान दिल्याचे दिसून आले आहे.

हे देखील पहा-

सोशल मीडियावर खूप लोक मुनमुन आणि राज यांच्या बरोबर आक्षेपार्ह मीम, फोटो, मजकूर पसरवत आहे. या माध्यमातून ट्रोलिंग सुरू झाली आहे. या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहलेली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य लोकांना सांगू इच्छिते की, तुमच्याकडून मला खूप अपेक्षा होते. मात्र, ज्या प्रकारच्या गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये लिहिले जात आहे.

यावरून शिकले- सवरले असलेले लोकांनीही दाखवून दिले आहे. की, आपण किती मागासलेल्या समाजातील आहोत. तुमची मस्करी एखाद्या व्यक्तीला मानसिकरित्या संपवू शकतो. अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले आहे की, महिलांना त्यांचे वय, शरीर, आई बनण्याच्या गोष्टीवर बोलणे. हे केवळ तुमच्याकरिता मस्करी असू शकणार आहे. पण तुमची मस्करी एखाद्याला मानसिक रित्या तोडू शकणार नाही.

TMKOC: अखेर बबिताचं ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर
Kabul Attack: 'हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही'- जो बायडन (व्हिडीओ)

याची तुम्हाला जाणीव देखील नाही. 13 वर्षांपासून मी लोकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करत आह. आणि माझी प्रतिष्ठा संपवायला तुम्हाला १३ मिनिट देखील लागले नाही. जर पुढीलवेळी कुणी नैराश्यात जाऊन स्वत:चा जीव घेतला आहे. तर जरा थांबून विचार करा की तुमच्या बोलण्याने तर ती व्यक्ती त्या निर्णयापर्यंत पोहोचली नाहीय ना. मला लाज वाटत आहे की, मी भारत देशाची मुलगी आहे, असे मुनमुन दत्ता यांनी सांगितले आहे.

आणखी एका पोस्टमध्ये मुनमुन दत्ता यांनी सांगितले की, मीडियाला कुणी अधिकार दिलेत की, काल्पनिक आणि स्वत: रचलेल्या गोष्टींना बातमीच्या नावाखाली कुणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकवण्याचा? मुनमुन दत्ता यांच्या पोस्टला आता बऱ्याच जणांनी समर्थन दिले आहे, आणि सोबत असल्याचे सांगितले जातं आहे.

Edited By- Digmbar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com