Usha Nadkarni : 'माझा मानव माझ्या हृदयात कायमच असेल'; मराठी अभिनेत्रीला अजूनही येतेय सुशांतसिंगची आठवण

मराठीसह अनेक हिंदी चित्रपट तसेच मालिकामधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या उषा नाडकर्णी यांचा आज वाढदिवस.
Usha Nadkarni
Usha Nadkarni Saam Tv

मुंबई: मराठीसह अनेक हिंदी चित्रपट तसेच मालिकामधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या उषा नाडकर्णी(Usha Nadkarni) यांचा आज वाढदिवस. अभिनेत्री आज ७५ वा वाढदिवस साजरा करत आहे. उषा यांनी मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. उषा नाडकर्णी १९७९ पासून चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकत आहेत. 'सिंहासन' या मराठी चित्रपटातून उषा यांनी चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले. उषा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची(Sushant Singh Rajput) 'ऑनस्क्रीन आई' म्हणूनही चाहत्यांमध्ये प्रसिध्द आहेत.

Usha Nadkarni
थरार आग्रा भेटीचा; डॉ.अमोल कोल्हे पुन्हा साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

१३ सप्टेंबर १९४६ रोजी मुंबईत जन्मलेल्या उषा नाडकर्णी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. १९८७ मध्ये त्यांनी 'सडक छाप' चित्रपटात एका अंध महिलेची भूमिका साकारली होती, त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांनी अनेक मराठी नाटक, सिनेमे, मालिका यामध्ये हात आजमावले आहेत. १९९९ मध्ये अभिनेत्री उषा नाडकर यांनी चित्रपटानंतर मालिकेत एण्ट्री केली. 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे त्यांना हिंदी प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळाली. मालिकेत त्या दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत झळकल्या होत्या. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सविता देशमुख यांच्या भूमिकेसाठी उषा नाडकर्णी यांना 'बेस्ट इव्हिल मदर- इन लॉ' पुरस्कारही मिळाला. सुशांत सिंग राजपूतच्या निंधनानंतर भावूक झालेल्या उषा नाडकर्णी यांनी "माझा मानव माझ्या हृदयात कायमच असेल त्याची जागा माझ्या हृदयातून कोणीही काढू शकत नाही" असे म्हटल्या होत्या.

Usha Nadkarni
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी कमी होईनात!, नव्याने समन्स बजावला

उषा नाडकर्णी यांनी १९९० साली आलेल्या 'वास्तव' चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपटात संजय दत्तचा मित्र देड फुटियाच्या आईची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. उषा नाडकर्णी यांनी 'गुंडाराज' चित्रपटात अजय देवगण, काजोल आणि अमरीश पुरीसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

उषा नाडकर्णी अभिनयासह त्यांच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखल्या जातात. परखड व्यक्तिमत्व, सडेतोड स्वभाव यामुळे उषा नाडकर्णी या नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच अभिनेता सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमात त्यांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बस बाई बस या कार्यक्रमातील उषा नाडकर्णी यांची लक्षवेधी मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com