Ranveer Singh: कॉलेजमध्ये असताना पैशांसाठी विकायचा बटर चिकन, आज बॉलिवूड गाजवतोय

एनर्जीचा पॉवर हाऊस मानला जाणारा बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग त्याच्या चित्रपटांतील भूमिका आणि अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या रणवीर सिंग त्याची पत्नी दीपिका पदुकोणसोबत अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
Ranveer Singh Birthday News
Ranveer Singh Birthday News Saam Tv

मुंबई : एनर्जीचा पॉवर हाऊस मानला जाणारा बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग(Ranveer Singh) त्याच्या चित्रपटांतील भूमिका आणि अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या रणवीर सिंग त्याची पत्नी दीपिका पदुकोणसोबत(Deepika Padukone) अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आज रणवीर सिंगचा त्याचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्त रोजच्या बातम्यांव्यतिरिक्त रणवीरचे काही सीक्रेट्स जाणून घेऊयात, असे सीक्रेट्स जे फार कमी लोकांना माहिती आहे.

Ranveer Singh Birthday News
अभिनेता राजकुमार राव म्हणाला, 'बॉलिवूडमध्ये नेपोटिझम कायमच राहील, पण...

रणवीरच्या आडनावाची कथा सगळ्यांनाच माहीत असेल. रणवीर सिंगचे नाव रणवीर भवनानी होते, जे नंतर त्याने बदलले. रणवीर सिंग हा सोनम कपूरची आई सुनीता कपूर यांचा नातेवाईक आहे. त्यामुळे रणवीर आणि सोनम यांचं भावा-बहिणीचं नातं आहे. म्हणूनच सोनमच्या लग्नात रणवीर खूप धमाल करताना दिसला होता.

Ranveer Singh Birthday News
न्यासाचा ग्लॅमरस लूक बघून फॅन्सचा 'याड लागलं...' , कोण आहे जाणून घ्या!

रणवीरला अभिनयाची आवड होती पण त्याला हेही माहीत होते की, चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करणे इतके सोपे नाही. क्रिएटिव्ह लेखनावर त्याचा भर होता. बॅचलरची पदवी मिळविण्यासाठी त्याने अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. युनिव्हर्सिटीत त्याने अभिनयाचे धडे घेण्यास सुरूवात केली.

रणवीरच्या कॉलेजच्या दिवसांत त्याने काम करून आपले शिक्षण पूर्ण केले होते. माहितीनुसार, युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना रणवीर स्टारबक्समध्ये अर्धवेळ काम करायचा. इतकेच नाही तर जास्त पैसे मिळविण्यासाठी तो आपल्या खोलीत बटर चिकन विकायचा. रणवीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, कॉलेजमध्ये तो त्याच्या मित्रांसाठी बटर चिकन बनवत असे आणि ते मित्रांना द्यायचा आणि त्यांना त्यांचे अभ्यास आणि इतर काम करून द्यायचे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com