
Ram Charan Adventure: दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याच्या अभिनयासोबतच तो त्याच्या जबरदस्त लुक्स आणि फिटनेससाठीही ओळखला जातो. रामचरण सध्या टांझानियामध्ये आपल्या परिवारासोबत सुट्टीचा आनंद लुटत आहे.
रामचरण सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. नेहमीच काही खास फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आफ्रिकेमध्ये ड्रायव्हिंगचा आनंद लुटताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रामचरण आपल्या कुटुंबासह टांझानियाला फिरायला गेला आहे. रामचरणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रामचरण पत्नी उपासना कोनिडेलासोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये रामचरण जीपमध्ये फिरताना दिसत आहे. याशिवाय तो तिथे स्वयंपाकही करताना दिसला. व्हिडिओमध्ये राम चरण एका मोकळ्या जागेत आम्लेट हाफ फ्राय करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये राम चरणचा लूकही चर्चेत दिसत आहे. त्याच्या कपड्यांनी आणि लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.व्हिडिओमध्ये रामचरण वाइल्डलाइफ फोटोग्राफी करताना दिसत असून व्हिडीओमध्ये त्याने 'चार्मिंग आफ्रिका' असे कॅप्शन लिहित फोटो शेअर केला आहे. रामचरणच्या या व्हिडिओवर यूजर्स भरपूर कमेंट करत आहेत.
या अभिनेत्याचा लूक आणि स्टाइल पाहून सर्वांनाच भुरळ पडते. बहुप्रतिभावान अभिनेता. राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'RC15' मध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या अॅक्शन ड्रामा चित्रपटात रामचरणसोबत कियारा अडवाणीही दिसणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.