टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजचा अपघात; प्रकृत्ती स्थिर

प्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेता साई धरम तेज शुक्रवारी रात्री एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजचा अपघात; प्रकृत्ती स्थिर
टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजचा अपघात; प्रकृत्ती स्थिरSaam Tv

प्रसिद्ध तेलुगू चित्रपट Tollywood अभिनेता साई धरम तेज Sai Dharam Tej Accident शुक्रवारी रात्री एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताविषयी मिळालेल्या माहितीनुसार, तो स्पोर्ट्स बाईक चालवत होता आणि त्याची बाईक चिखलात घसरली. हैदराबादमधील Hyderabad दुर्गामाचेरुवु केबल पुलाजवळ ही घटना घडली आहे. अपघातानंतर सई बेशुद्ध झाला होता. या अपघातामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. 34 वर्षीय सईला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.

सुपरस्टार चिरंजीवी यांचे पुतणे साई धरम तेज यांच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे की, 'साई धरम तेज चांगले आहेत आणि ते बरे होत आहे. काळजी करण्याची काहीच कारण नाही. तो रुग्णालयाच्या देखरेखीखाली आहे. त्याची प्रकृती स्थिर होताच त्याला पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात नेले जाईल.

पोलिसांनी याबद्दल सांगितले की, 'साई धरम तेजने हेल्मेट घातले होते आणि त्याने दारू प्यायली नव्हती. रस्त्यावर त्याची दुचाकी घसरली. तो आता धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर, साईची चित्रे इंटरनेटवर व्हायरल Viral झाली ज्यामध्ये त्याच्या डोळ्यावर आणि छातीवर जखमेच्या खुणा दिसत आहेत. ही बातमी बाहेर येताच त्याचे कुटुंबातील सदस्य भाई वैष्णव तेज, काका पवन कल्याण, चुलत भाऊ वरुण तेज, निहारिका कोनिदेला आणि मित्र संदीप किशन त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

साईचे काका अल्लू अरविंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'त्यांना शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता अपघात झाला. तो आता सुरक्षित आहे. मी डॉक्टरांशी याबद्दल बोललो. उद्यापर्यंत त्याला आयसीयूमधून हलवण्यात येईल. मला इथे हे स्पष्ट करायचे आहे की त्याच्या डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला कोणतीही इजा नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com