TDM Film Support: नाद करा पण आमचा कुठं... 'टीडीएम'ला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ग्रामीण भागातून मिळतोय चित्रपटाला पाठिंबा

'टीडीएम' चित्रपटाच्या समर्थनार्थ पुण्यात अनेक शेतकरी बांधव एकत्र येत, ट्रॅक्टर मोर्चा काढत सहभाग दर्शविला.
TDM Film Support In Pune Farmer
TDM Film Support In Pune FarmerSaam Tv

TDM Film Support In Pune Farmer: मराठी सिनेमांना प्राईम टाइम नाहीच, मात्र मराठी सिनेमांना किमान मुबलक शो तरी मिळावेत यासाठी आजवर कित्येक चित्रपट निर्मात्यांनी, कलाकारांनी भाष्य केलं आहे. अशातच भरडला गेलेला एक सिनेमा म्हणजे 'ख्वाडा', 'बबन' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचा म्हणजे भाऊराव कऱ्हाडेंचा 'टीडीएम' हा चित्रपट. या चित्रपटाला घेऊन मात्र सिनेविश्वात पहिल्यांदाच अचंबित करणारी घटना घडलीय.

TDM Film Support In Pune Farmer
महाराष्ट्रातील नेत्यांनी The Kerala Story चे स्पेशल स्क्रिनिंग केल्याने केदार शिंदेंचा राग अनावर; म्हणाले- ‘नेत्यांना ठाऊक असेल का?...’

'टीडीएम' या सिनेमाला चित्रपटगृहात शो नसल्यामुळे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मंडळींनी भाष्य करत न्याय मागितला. दरम्यान या सर्वांना न्यायाची मागणी करताना अश्रू ही अनावर झाले आहेत. हा सर्व प्रकार बघता नामवंत राजकीय नेते अजित पवार यांनी देखील 'टीडीएम' चित्रपटांना स्क्रीन मिळण्याबाबत ट्विट केलं होत. मात्र या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी न राहवून 'टीडीएम' चित्रपटाला प्रेक्षकांनी साथ दिली. प्रेक्षकांनी 'हा चित्रपट पाहायचा आहे' असे नारे लगावण्यास सुरुवात केली आहे. 'टीडीएम' चित्रपटाच्या समर्थनार्थ काल छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथे सर्व शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत यांत सहभाग दर्शविला.

'मराठीची गळचेपी दूर झालीच पाहिजे', ''टीडीएम'ला प्राईमटाईम शो मिळालेच पाहिजे', 'मला 'टीडीएम' पाहायचाय मुंबई - पुण्यात कुठेच नाही' असे नारे लगावत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. एकूणच हे नागरिकांनी, प्रेक्षकांनी केलेलं आंदोलन पाहता त्यांचं 'टीडीएम' चित्रपटावरील, भाऊरावांवरील प्रेम, विश्वास याची प्रचिती येते. खेड्यापाड्यातून स्वमेहनतीने स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या या 'टीडीएम' चित्रपटाच्या संपूर्ण टीममागे आज शेतकरी बांधव उभा आहे, ही वाखाणण्याजोगी बाब आहे.

TDM Film Support In Pune Farmer
Gauhar Khan Baby Bump: कुणी येणार गं! गौहर खानने फ्लॉन्ट केले बेबी बंप, फोटो होतायेत व्हायरल

पुणे शहरात टीडीएम चित्रपटाला फक्त २२ थेटर मिळाले होते, तसेच प्राईम टाईम शो न मिळणे हा चित्रपटावर झालेला अन्याय पाहता या चित्रपटाचे चित्रपटगृहातील प्रदर्शन चित्रपटाचे निर्माते भाऊराव कऱ्हाडे यांनी स्वतः रद्द केले होते. दरम्यान सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांनी एकत्र येऊन टीडीएम चित्रपटावर आणि भाऊरावांवर झालेला अन्याय पाहता भरघोस पाठिंबा दिला. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन हा चित्रपट नव्याने चित्रपटाचे निर्माते चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळेल ही दिलासादायक बातमी लवकरच मिळेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com