भाऊ आणि बहिणीच्या अनमोल नात्यावर आधारित 'रक्षा बंधन'चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
भाऊ आणि बहिणीच्या अनमोल नात्यावर आधारित 'रक्षा बंधन'चा ट्रेलर प्रदर्शित
Raksha Bandhan MovieSaam Tv

मुंबई - अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या आगामी रक्षाबंधन या चित्रपटासाठी चर्चेत आहे. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या अनमोल नात्यावर आधारित आहे. ट्रेलरनुसार अक्षय आणि भूमीचा आगामी चित्रपट हुंडा प्रथेवर एक मोठा संदेश देणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये प्रेमाचे अनेक रंग पाहायला मिळत आहेत.चित्रपटाची कथा नवीन असली तरी अक्षय कुमारचा लूक जुना आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच हा चित्रपट मनोरंजनाने भरलेला असल्याचे कळते. अक्षय कुमारने एक दिवसापूर्वी ‘रक्षाबंधन’ चित्रपटच पोस्टर शेअर केले होते त्यानंतर आता लगेच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयच्या गर्लफ्रेंडची भूमिका भूमी पेडणेकर साकारत आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अक्षयच्या ४ बहिणींची भूमिका सादिया खतीब,स्मृती श्रीकांत, शहजमीन कौर आणि दीपिका खन्ना यांनी साकारली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी अक्षयच्या चाहत्यांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Raksha Bandhan Movie
मुलीचे मैत्रीणीवरच जडले प्रेम..लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्यासाठी गेले घरातून पळून

एकीकडे चार बहिणींच्या लग्नाचे दु:ख आहे. तर दुसरीकडे भूमी पेडणेकरच्या वडिलांची इच्छा आहे की तिने ६ महिन्यांत लग्न करावे. त्यामुळे अक्षय कुमारला 6 महिन्यांच्या आत त्याच्या बहिणींचे लग्न करायचे आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांचा हा चित्रपट यावर्षी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com