तान्हाजी नंतर अजय देवगणच्या दुसऱ्या दमदार चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अजय देवगणचा भुज - द प्राइड ऑफ इंडिया हा चित्रपट एक पीरियड वॉर फिल्म आहे. ज्याची कथा 1971 च्या भारत-पाक युद्धावरुन काढली गेली आहे.
तान्हाजी नंतर अजय देवगणच्या दुसऱ्या दमदार चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
तान्हाजी नंतर अजय देवगणच्या दुसऱ्या दमदार चित्रपटाचा ट्रेलर रिलीजSaam Tv

पुणे : अजय देवगणचा Ajay Devgan भुज - द प्राइड ऑफ इंडिया Bhuj-The Pride Of India हा चित्रपट एक पीरियड वॉर फिल्म आहे. ज्याची कथा 1971 च्या भारत-पाक युद्धावरुन काढली गेली आहे. Trailer release of Ajay Devgn's second powerful film Bhuj the pride of India

देशभक्ती आणि शौर्याच्या दृश्यांनी भरलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या सर्व प्रमुख पात्रांची झलक दिसून आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भुज 13 ऑगस्ट रोजी डिझनी प्लस हॉटस्टार व्हीआयपी Disney Plus Hotstar VIP वर रिलीज होईल. मुख्य भूमिकेत असलेला अजय देवगनचा हा पहिला चित्रपट आहे, जो थेट ओटीटी OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे.

भुज - या ऐतिहासिक युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत असताना प्राइड ऑफ इंडिया याच निमित्ताने येत आहे. अजय भारतीय हवाई दलाच्या स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची Vijay Karnik भूमिका साकारत आहे. जो त्यावेळी भुज विमानतळाचा प्रभारी होता. 1971 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान सुरू केले. पाकिस्तानने 14 दिवसात ३५ वेळा ९२ बॉम्ब आणि २२ रॉकेट्सने भुज एअरफील्डवर हल्ला केला होता. Trailer release of Ajay Devgn's second powerful film Bhuj the pride of India

युद्धाच्या वेळी शत्रूंनी हवाई तळ नष्ट केले. त्यानंतर विजयने माधापूर गावातल्या 300 महिलांसह भारतीय हवाई दलाची विमान उतरता यावी यासाठी हवाई तळ तयार केला होता. रणछोडदास पागीच्या भूमिकेत संजय दत्त आहे. अ‍ॅमी विर्क विक्रम सिंह बाज जेठजच्या भूमिकेत आहे. सुंदरबेन जेठा असे सोनाक्षीच्या Sonakshi Sinha पात्राचे नाव आहे. त्याचवेळी नोरा, हिरा रहमान नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. शरद केळकर आणि प्रणीता सुभाषसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.

तान्हाजी नंतर अजय देवगणच्या दुसऱ्या दमदार चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
बापरे ! महिलेच्या शरीरात चक्क कोरोनाच्या दोन व्हेरियंटचा शिरकाव !

भुज अजय देवगण निर्मित आणि अभिषेक दुधैया दिग्दर्शित आहेत. निर्माता म्हणून अजयचा त्रिभंगा नेटफ्लिक्स आणि द बिग बुल डिझनी प्लस हॉटस्टार व्हीआयपी वर दिसला आहे. सध्या अजय आपला होम प्रोडक्शन चित्रपट मे-़डे या चित्रपटाचे दिग्दर्शनही करीत आहे. या चित्रपटात अजयसह अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत मुख्य भूमिकेत आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com