Tu Jhooti Main Makkar Box Office Collection Day 2: 'पठान'नंतर 'तू झूठी मैं मक्कर'ने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी

चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असून दुसऱ्या दिवशीही छप्पर फाडके कमाई केली आहे.
Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection
Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection Instagram @shraddhakapoor

Tu Jhooti Main Makkar Box Office Collection Day 2: 'तू झूठी मैं मक्कर'मधील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लव रंजन दिग्दर्शित हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट होळीच्या दिवशी ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत सध्या बराच चर्चेत आला आहे. यासोबतच चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असून दुसऱ्या दिवशीही छप्पर फाडके कमाई केली आहे.

Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection
Kiran Mane Post: बर्‍याचजणांना मी संपलो असं वाटलं..., किरण मानेंच्या पोस्टने चाहते चिंतेत

या चित्रपटात मुख्य भूमिकेत श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.73 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यासाठी थोडा अपयशी ठरला.

पहिल्या दिवसाच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय घट झाली आहे. सॅकलिनच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 9 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 24.73 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

इमरान हाश्मीचा सेल्फी प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारला होता, तर रणबीर कपूरचा 'तू झूठी मैं मक्कर' प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. आता सगळ्यांच्या नजरा चित्रपटाच्या विकेंड कमाईवर आहेत. पहिल्या आठवड्याच्या विकेंडमध्ये 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटाच्या कमाईत दिलासादायक कमाई होईल अशी आशा आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरसोबत बोनी कपूरदेखील या चित्रपटात दिसणार आहे. बोनी कपूरचा हा पहिला चित्रपट असून त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले. डिंपल कपाडियाही चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com