Hardeek Akshaya Wedding: तुझ्यात जीव रंगला… राणादा-अंजलीबाई बांधणार लग्नगाठ, कधी आणि कुठे?

बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांनी लग्नाबद्दलही विचारले होते, पण त्यांच्याकडून लग्नाची तारीख सांगितली जात नव्हती. अखेर आज तो दिवस उगवला आहे.
Akshaya And Hardeek
Akshaya And Hardeek Saam Tv

Hardeek Akshaya Wedding: राणादा आणि अंजलीबाईंच्या लग्नाची चर्चा त्यांचा साखरपुडा झाल्यापासून होत आहे. 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा आणि अंजलीबाई अर्थातच हार्दिक आणि अक्षय यांनी आपल्या लग्नाचे अनेकदा अपडेट सोशल मीडियावरुन दिले होते. बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांनी लग्नाबद्दलही विचारले होते, पण त्यांच्याकडून लग्नाची तारीख सांगितली जात नव्हती. अखेर आज तो दिवस उगवला. आज 25 नोव्हेंबर रोजी हार्दिक आणि अक्षया विवाह बंधनात अकडणार आहेत.

Akshaya And Hardeek
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, जाणून घ्या काय आहे कारण?

हार्दिक आणि अक्षया हे दोघेही आपल्या भेटीला झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून आले होते. कोल्हापूरच्या मातीत रंगलेल्या या मालिकेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय मालिकेतील प्रमुख कलाकार हार्दिक आणि अक्षया यांच्यावरही भरभरून प्रेम केलं. हार्दिक या मालिकेत राणादादा तर अक्षया अंजली बाईंच्या भूमिकेत होत्या.

Akshaya And Hardeek
Hardik And Akshaya Wedding: पाठकबाई आणि राणादाचे चाहत्यांना अनोखे गिफ्ट; पत्रिका आल्या पण तारीख गुलदस्त्यात

त्यांची ही जोडी पडद्यावरही हिट होती आणि आता रियल लाईफमध्येही हिट ठरणार आहे. आजही या दोघांना कुणी हार्दिक आणि अक्षया म्हणून फारसं ओळखत नाहीत तर 'राणादा आणि पाठक बाई' म्हणूनच त्यांची ओळख कायम आहे. असे प्रेक्षकांचे लाडके राणादा आणि पाठक बाई आज खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जीवनसाथी होणार आहेत.

Akshaya And Hardeek
Vikram Gokhale Health Update: विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, मेडिकल बुलेटिन जारी

दोन दिवसांपूर्वीच अक्षयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.'मला नवरी झालेल्या पाहायला तुम्ही सज्ज आहात का?' अशा आशयाची टॅगलाईन टाकत पोस्ट शेअर केली होती. अखेर तो क्षण आला आहे. आज पुण्यामध्ये त्यांचे लग्न पार पडणार असून अत्यंत पारंपरिक असा हा विवाह सोहळा असणार आहे. या सोहळ्याला मनोरंजन विश्वातील काही मोजकेच चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हार्दिक अक्षय पहिले एकत्र काम करताना खूप चांगले मित्र होते. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हे दोघे लव्हबर्ड्स आता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचा साखरपुडा गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा उरकला. त्यानंतर सर्वांनाच त्यांच्या लग्नाची कमालीची उत्सुकता होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com