Karan-Tejasswi Video: 'किस' किसको प्यार करू; करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशचा सर्वांसमोरील 'तो' व्हिडिओ व्हायरल

करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
Karan-Tejasswi Viral Video
Karan-Tejasswi Viral VideoInstagram @tejasswipraakash18

Karan Kundrra-Tejasswi Prakash Viral Video: बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश तिच्या कामासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांच्या प्रेमाची सुरूवात बिग बॉसच्या घरातून झाली. शो संपल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर करण आणि तेजस्वीचे नाते आणखी घट्ट झाले आहे. दोघेही सर्वांसमोर अनेकदा त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसले आहेत. तसेच करण आणि तेजस्वी सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो देखील शेअर करत असतात.

करण नेहमीच त्याची गर्लफ्रेंड तेजस्वीला प्रोटेक्ट करताना दिसतो. चाहत्यांना ही जोडी खूप आवडते, दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेते. दरम्यान या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तेजस्वी आणि करण एका पार्टीत दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये हे कपल खूपच क्यूट दिसत आहे. तेजस्वी खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तसेच तेजस्वीच्या बाजूला अर्जुन बिजलानीही दिसत आहे.

Karan-Tejasswi Viral Video
'Pathan' 5 Day: 'पठान'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड, पाच दिवसातच केली दमदार कमाई...

तेजस्वी प्रकाश आणि अर्जुन बिजलानी बोलत असताना करण कुंद्रा अचानक तिथे येऊन तेजस्वीचे चुंबन घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेजस्वीलाही क्षणभर धक्का बसतो. त्यांचा हा व्हिडिओ खूपच क्यूट आहे. एकीकडे चाहते या जोडीचा हा व्हिडिओ खूप पसंत करत आहेत. दुसरीकडे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही सोशल मीडिया यूजर्स त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.

तेजस्वी आणि करणच्या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, माहित नाही पण मला हे दोघे खूप दिखाऊ वाटतात. दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, हा कुंद्रा जर अतिच करतो… थर्ड क्लास आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, तो वेडा आहे का, जेव्हा पाहावं तेव्हा किस करत असतो.

तेजस्वी आणि करण कुंद्रा यांच्या प्रेमाची सुरुवात बिग बॉस 15 मध्ये झाली होती. शोमध्ये दोघांमध्ये खूप भांडण देखील झाले होते, पण अनेक मोठ्या भांडणानंतरही दोघे आज एकत्र आहेत. बिग बॉस 15 ची तेजस्वी प्रकाश विजेती देखील झाली होती. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघेही एकमेकांसोबत मस्त वेळ घालवत असतात.

या जोडीचे चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. तेजस्वीचा शो नागिन 6 लवकरच संपणार आहे. करण कुंद्राचा लवकरच 'इश्क घायाल' प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच दिवसांनी करण एका मालिकेत अभिनय करताना दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com