
'नागिन' फेम अभिनेत्री तेजस्विनी प्रकाश (Actress Tejasswi Prakash) कायमच सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते . एकता कपरूच्या 'नागिन' या मालिकेतून तेजस्वी प्रचंड प्रकाशझोतात आली. या मालिकेमुळे तेजस्वीला चांगली ओळख मिळाली. नागिनची भूमिका साकारणारी तेजस्वी ही सर्वांत महागडी अभिनेत्री आहे.
तेजस्वी प्रकाश आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे तेजस्वीचा नवा व्हिडीओ. तेजस्वीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये तेजस्वी कॅमेऱ्यासमोर मेकअपशिवाय आलेली दिसली. तेजस्वीला पाहून ओळखणं देखील कठीण झाले आहे.
बॉलिवूड असो वा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री या त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. घरातून बाहेर पडताच, विमानतळ असो किंवा लंच आउटिंग पापाराझींचे कॅमेरे त्यांना स्पॉट करतात. त्यामुळे या अभिनेत्रींना कुठेही जाताना टिप-टॉप राहावच लागचे. कारण सोशल मीडियाच्या जमान्यात युजर्स त्यांना लूक आणि मेकअपवरून ट्रोल करतात.
अशामध्ये टेलिव्हिजनची 'नागिन' म्हणजेच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही कॅमेऱ्यासमोर अशा लूकमध्ये दिसली की तिला पाहून पहिल्यादा कोणालाच ओळखता आले नाही. मेकअपशिवाय तेजस्वीचा लूक पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तेजस्वी प्रकाशने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत आणि खांद्यावर काळ्या रंगाची बॅग अडकवली आहे. तिने कपाळावर कुंकूचा टिळा देखील लावलेला दिसत आहे.
बिल्डिंगमधून बाहेर पडल्यानंतर पापाराझींच्या कॅमेऱ्याला पाहून तेजस्वी गोंधळते. ती घाईघाईमध्ये गाडीत बसते. मेकअपशिवाय तेजस्वीला पाहून अनेकांना ओळखताच आले नाही. तेजस्वीला पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तेजस्वीला तिच्या नो-मेकअप लूकमध्ये पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. तेजस्वी प्रकाशचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या चर्चेत आला आहे.
दरम्यान, तेजस्वी प्रकाशने एकता कपूरच्या टीव्ही सीरियल नागिनच्या 'सीझन ६' मध्ये काम केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेजस्वी या शोच्या एका एपिसोडसाठी सुमारे 2 लाख रुपये घेत होती. अभिनेत्रीच्या नात्याबद्दल सांगायचे झाले तर, तेजस्वी आणि करण कुंद्रा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही रोज सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. दोघांच्याही चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. या दोघांची लव्हस्टोरी बिग बॉसपासूनच सुरू झाली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.