पाॅर्न व्हिडिओ प्रकरणी आणखी २ मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर

राज कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अ‍ॅप्सची निर्मिती केलेली आहे
पाॅर्न व्हिडिओ प्रकरणी आणखी २ मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर
पाॅर्न व्हिडिओ प्रकरणी आणखी २ मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवरSaam Tv

मुंबई - पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणाऱ्या रॅकेट प्रकरणात गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षात सोमवारी रात्री उशिरा उद्योगपती व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रा Raj Kundra याला अटक करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणातमुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या पॉर्न फिल्म्स प्रकरणी राज कुंद्रासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. रायन जॉर्न थाँर्प असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी वेरूळचा राहणारा आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, राज कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अ‍ॅप्सची निर्मिती केलेली आहे असे उघडकीस झाले आहे. या कंपन्यावर काही दिवस स्वतः डायरेक्टर म्हणून काम पहायचा आणि त्यानंतर राजीनामा देऊन आपलाच एका म्होरक्या त्या पदावर बसवायचा. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओसचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्यावरून राज कुंद्राच्या विरोधात सबळ पुरावे हाती लागले आहे.या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मॉडेल्सचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

पाॅर्न व्हिडिओ प्रकरणी आणखी २ मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर
पाॅर्न व्हिडिओच्या व्यवहारांसाठी राज कुंद्राचे पाच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

राज कुंद्राने या सर्व रँकेटचा व्यवहार करण्यासाठी एच अकाउंट्स या नावाने ५ जणांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला होता. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये राज कुंद्रा, मेघा विहान अकाऊन्ट, प्रदीप बक्षी, रॉय डिजिटल मार्केटिंग अकाऊन्ट आणि रॉय इवेन्ट कन्टेट हेड या पाच जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.या चॅटमध्ये या व्हिडिओतून कमावलेल्या पैशांचा आकडा देखील समोर आला आहे. त्यात टोटल ऑर्डर १४३३, टोटल कॉइन्स ३ लाख ३२ हजार ४८३,टोटल सेल ४ लाख ४० हजार ३६३ आणि एमटीडीसी सेल २७ लाख ८१ हजार ५५१ असा हिशोब मांडण्यात आला असून कुंद्रा यांचं लोकांशी चॅट केलेला पुरावा पोलिसांच्या हाती लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com