Happy Birthday Vicky Kaushal: अभिनय क्षेत्रात येण्याआधी विकी परदेशात करायचा ‘हे’ काम, पाहा विकीच्या आयुष्यातील Unknown Facts

सध्या विकी कौशल- सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या जीवनातील चाहत्यांना माहित नसणाऱ्या गोष्टी सांगणार आहोत.
Vicky Kaushal Unknown Facts
Vicky Kaushal Unknown FactsInstagram

Vicky Kaushal Unknown Facts: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आपल्या भारदस्त अभिनयामुळे सर्वत्रच चर्चेत आहे. त्याच्या सिनेकारकिर्दित ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ सारखा चित्रपट मिळाला अन् नशीब पालटलं. विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. तो आज ३५ वर्षांचा होणार असून त्याचा जन्म १६ मे १९८८ रोजी झाला होता. सध्या विकी कौशल- सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या जीवनातील चाहत्यांना माहित नसणाऱ्या गोष्टी सांगणार आहोत.

Vicky Kaushal Unknown Facts
Gautami Patil Marriage Plan: गौतमी पाटील लवकरच लगीनगाठ बांधणार, काय म्हणाली? पाहा VIDEO

विकी कौशलने फार कमी वेळेतच बॉलिवूड सिनेइंडस्ट्रित आपले नाव कमावले आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटानंतर विकी कौशलचा बॉलिवूडमध्ये ए ग्रेड कलाकारांच्या यादीत समावेश झाला. सोबतच, रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘संजू’ चित्रपटातील तिच्या ‘कमली’ या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांसह सर्वांकडूनच कौतुकाची थाप पडली. विकीने आपले शिक्षण इंजिनीअरिंग क्षेत्रात पुर्ण केले आहे. त्याने परदेशात दूरसंचार अभियंता (Tele Communication Engineer) म्हणूनही काम केले आहे. पण लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती, ती पूर्ण करण्यासाठी चांगली नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले.

Vicky Kaushal Unknown Facts
Anushka Sharma Bike Ride Video: अनुष्काची बॉडीगार्डसोबत बाईक राईड; Video पाहून नेटकऱ्यांनी चांगलंच झोडपलं

विकीने अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून जबाबदारी पेलली होती. यानंतर त्याने ‘लव शुव ते चिकन खुराना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण त्याला ‘मसान’ चित्रपटातून ओळख मिळाली. विकी कौशलचे वडील श्याम कौशल बॉलिवूडमध्ये ॲक्शन डायरेक्टर म्हणून काम करायचे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये विक्कीने मुंबईच्या चाळीत कुटुंबासोबत राहिला आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफने ९ डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांनी ही एकमेकांना अनेक दिवस डेट केले होते. सोबतच विकी- कतरिना अनेक पार्ट्यांमध्ये देखील एकत्र स्पॉट झाले होते. अनेक दिवस एकत्र स्पॉट झाल्यानंतर ते लग्नबंधनात अडकले. विकी आणि कतरिनाची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे. दोघांच्या ही रिलेशनची सुरूवात करण जोहरच्या शोपासून झाली, जेव्हा करणने कतरिनाला विचारले, तिला कोणासोबत काम करायला आवडेल तेव्हा तिने विकीचेच आवर्जुन नाव घेतले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com