
Madhuri Dixit And Snehlata Dixit Film: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितला आज अर्थात १२ मार्च रोजी मातृशोक झाला आहे. स्नेहलता दीक्षित यांनी वयाच्या ९० व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्नेहलता दीक्षित यांच्यावर मुंबईतील वरळीतील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्नेहलता दीक्षित सिनेसृष्टीतील नसल्यातरी त्यांनी आपल्या लेकीसोबत एक गाणं गायलं होतं.
माधुरीने सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्या फोटोला आईचीच कार्बन कॉपी वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. स्नेहलता दीक्षित या पूर्वी सिनेइंडस्ट्रित नसून त्यांनी आपल्या मुलीसोबत एका चित्रपटातील गाणं गायलं होतं. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुलाब गँग' या चित्रपटासाठी दोघींनी मिळून एक गाणं गायलं होतं.
"आम्ही जेव्हा माधुरीला या चित्रपटासाठी गाणं गाण्यास सांगितलं, तेव्हा ती आनंदाने तयार झाली होती. रेकॉर्डिंगला येताना माधुरीने आईलाही सोबत आणलं होतं. त्यावेळी आम्हाला समजलं की त्यासुद्धा उत्तम गायिका आहेत. तेव्हा आम्ही स्नेहलता यांना विचारलं की तुम्हीसुद्धा चित्रपटासाठी गाणं गाऊ शकाल का? अखेर गुलाब गँग चित्रपटासाठी माधुरी आणि तिच्या आईने मिळून गाणं रेकॉर्ड केलं", हा किस्सा दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी सांगितला होता.
माधुरी अनेक मुलाखतींमध्ये आपल्या आईविषयी व्यक्त झाली आहे. आईने दिलेली शिकवण आणि संस्कार या विषयावर माधुरीने भाष्य केले होते. ज्याप्रकारे आईने लहानाचं मोठं केलं, शिकवण दिली, त्यानंतर प्रसिद्धी मिळाल्यानंतरही माधुरीच्या जीवनशैलीवर कोणताही फरक पडला नाही. असं तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
माधुरीने आतापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीत जी काही आतापर्यंत प्रसिद्धी मिळवली आहे, ती आपल्या आईने दिलेल्या शिकवणीवरंच मिळवलेली आहे. माधुरीने अनेकदा आपल्या आईसाठी खूप चांगली पोस्ट लिहिली होती, त्या पोस्टमध्ये माधुरी म्हणते, "आजवर मी जे काही आहे आणि यापुढेही मी जे असेन, ते तुझंच प्रतिबिंब असेन." अशी खास पोस्ट माधुरीने खास आपल्या आईसाठी लिहिली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.