
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (actress) आणि अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीमुळे खूप चर्चेत आहे. सध्या सोनम तिचा पती आनंद आहुजासोबत (Anand Ahuja) लंडनमध्ये राहत आहे. जिथे ती तिच्या होणाऱ्या बाळाचे स्वागत करणार आहे. आता सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम लंडनमध्ये झाला. सोनमने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम (instagram) अकाउंटच्या स्टोरीवर डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्याचवेळी तिची बहीण रिया कपूरने (Rhea Kapoor) देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सोनमच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
रिया कपूरने सोनमला टॅग केलं आहे. 'हा खूप सुंदर डोहाळे जेवणचा कार्यक्रम होता,' असं तिनं म्हटलं आहे. यासह तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीद्वारे चाहत्यांना डोहाळे जेवणाची खास झलक दाखवली आहे. गंमत म्हणजे सोनमच्या डोहाळे जेवणामध्ये सहभागी झालेल्या लिओ कल्याण नावाच्या कलाकाराने यावेळचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावरची ही छायाचित्रे पाहून सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम बागेत झाल्याचे दिसते. डोहाळे जेवणाच्या व्हिडिओमध्ये सोनम कपूर 'मसकली' गाण्यावर ताल घेताना दिसते. त्याच वेळी तिची बहीण रिया कपूर देखील या गाण्यावर नाचताना दिसली. रिया आणि सोनम कपूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये फोटो आणि व्हिडिओद्वारे डोहाळे जेवणाची व्यवस्था आणि सजावट दाखवली आहे. ज्यामध्ये डोहाळे जेवणासाठी सुंदर सजावट, फुले, भेटवस्तू पाहायला मिळते.
डोहाळे जेवणादरम्यान सोनमने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्ट दिसत होता. मोकळ्या केसांमध्ये सोनम नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती.
या वर्षी मार्चमध्ये सोनमने तिच्या प्रेग्नन्सीबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. तिने पती आनंद आहुजासोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'चार हात, तुमची शक्य तितकी काळजी घेईल. दोन हृदय, जे तुमच्यासोबत धडधडतील. एक कुटुंब, जे तुम्हाला प्रेम आणि आधार देईल. आम्ही तुमच्या आगमनाची वाट पाहत आहोत.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.