Munawwar Rana Hospitalised: मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात उपचार सुरू...

Poet Munawwar Rana admitted to Lucknow: उर्दू कवी आणि लेखक मुनव्वर राणा यांची गुरूवारी पहाटे तब्येत बिघडली आहे.
Munawwar Rana Hospitalised
Munawwar Rana HospitalisedSaam Tv

Munawwar Rana Health Update: उर्दू कवी आणि लेखक मुनव्वर राणा यांची गुरूवारी अर्थात आज पहाटे तब्येत बिघडली आहे. लगेचच तात्काळ त्यांना लखनऊच्या अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मुलगी सुमैय्या राणा यांनी दिली आहे.

Munawwar Rana Hospitalised
Nawazuddin Siddiqui On The Kerala Story: नवाजुद्दिनचं ‘द केरला स्टोरी’ पाहिल्यानंतर मोठं वक्तव्य ; ‘चित्रपट नागरिकांना जोडणारा असावा, तोडणारा नाही....’

सुमैया राणा यांनी वडिल मुनव्वर राणा यांच्या हेल्थ अपडेट देताना म्हणाली, “वडील व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी अर्थात आज पहाटे त्यांना लखनऊतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे.”

सोबतच हेल्थ अपडेट देताना ती पुढे म्हणते, “वडिलांना डायलिसिसच्या वेळी त्यांच्या पोटात खूप दुखू लागले होते. डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करायला सांगितला होता, त्यांना पोटा संबंधित आजार असल्याने त्यांनी तात्काळ शस्त्रक्रिया केली. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.” अशी तिने यावेळी प्रतिक्रिया दिली. सुमैया राणा यांनी दिलेल्या माहितीत, डॉक्टरांनी आपल्या वडिलांसाठी पुढील ७२ तास फारच महत्वाचे असल्याची माहिती दिली.

Munawwar Rana Hospitalised
Harman Baweja Relationship With Priyanka Chopra: १५ वर्षांनी अभिनेता हरमन बावेजाने प्रियांका चोप्रासोबतच्या नात्यावर सोडले मौन

मुनव्वर राणा यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून खराब आहे. याआधीही त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआय या रूग्णआलयात दाखल दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांच्यावर दिल्लीतही उपचार करण्यात आले होते. मुनव्वर राणा यांना किडनी संबंधित काही दुर्धर आजार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दीर्घकाळापासून डायलिसिसचे उपचार सुरू आहेत.

मुनव्वर राणा हे भारतातील एक प्रसिद्ध उर्दू कवी आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गझल लिहिल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांना मिळालेला उर्दू साहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी नाकारला होता. सोबतच, देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे पुन्हा कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी देखील त्यांनी शपथ घेतली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com