Urfi Javed: भलतीच दिलदार, खास टीमसाठी घेतली आलिशान कार, कारण....

कधी झाडांची पानं, कधी फुलं तर कधी सिम कार्ड अशा नानाविध गोष्टींनी फॅशन करणारी उर्फी आता एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
urfi javed bought brand new suv car
urfi javed bought brand new suv carInstagram

Urfi Javed: अतरंगी फॅशन आणि आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारी ऊर्फी जावेद कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असते. कधी झाडांची पानं, कधी फुलं तर कधी सिम कार्ड अशा नानाविध गोष्टींनी फॅशन करणारी उर्फी आता एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नुकतीच तिने नवी कार खरेदी केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण ही कार तिने स्वतःसाठी नाही भलत्याच कोणासाठी घेतली.

urfi javed bought brand new suv car
Who Is Actress: अवघ्या 18 व्या वर्षी देशाचे नावे केले मोठे, खिडकीत उभी असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलत का ?

आपल्या फॅशनने चर्चेत राहणाऱ्या उर्फीचे सध्या अनेक फोटोशूट चर्चेत आहे. नुकतेच तिने एका अवॉर्ड सोहळ्याला अंगावर नाग घेऊन गेली होती. त्याचीच चर्चा कमी पडली की काय म्हणून तिने पुन्हा एकदा नवा कारनामा केला. नुकतीच तिने नवी कार खरेदी केली असून पण ती कार तिच्यासाठी नसून तिच्या टीम आणि स्टाफसाठी खरेदी केली आहे.

उर्फीचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून त्या व्हिडीओत ती गाडीवरून पडदा काढताना दिसत आहे. यावेळी उर्फीने गाडीच्या शो रूममध्ये सेलिब्रेशन म्हणून केक कापत आनंद साजरा केला. उर्फीने यावेळी ऑडी किंवा बीएमडब्लू ही अलिशान कर खरेदी केली नसून नवी कोरी SUV गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत २५ ते ३१ लाखांच्या दरम्यान आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, उर्फीने ही अलिशान कार स्वतः साठी नाही तर तिच्या तिच्या स्टाफ आणि टीमसाठी घेतली आहे. जिथे माझी शूटिंग आहे, त्याठिकाणी माझी टीम व्यवस्थित पोहोचू शकेल किंवा आरामात ते येऊ शकतील. त्यांना रिक्षाने यावं लागत असल्याने मी त्यांच्या साठी ही कार खरेदी केली असल्याचे सांगितले. या गाडीत माझा मॅनेजर, माझा मेकअप आर्टिस्ट, बाउंसरसोबत सगळे आरामात बसू शकतात. असं यावेळी उर्फी माध्यमांसमोर बोलली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com