रणवीर अन् उर्फीचा छंद एकच; उर्फीच्या बोल्ड लूकवर नेटिझन्सच्या भन्नाट कमेंट, व्हिडिओ व्हायरल

'बिग बॅास' फेम उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि हटके स्टाईलमुळे लोकप्रिय आहे. उर्फीने तिच्या अंतरंगी स्टाइलने नेटिझन्सना भुरळ घातली आहे.
Urfi Javed
Urfi JavedSaam Tv

मुंबई: 'बिग बॅास' फेम उर्फी जावेद(urfi javed) तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि हटके स्टाईलमुळे लोकप्रिय आहे. उर्फीने तिच्या अंतरंगी स्टाइलने नेटिझन्सना भुरळ घातली आहे. अनेकदा उर्फीचे अंतरंगी ड्रेसमधील फोटो आणि व्हिडिओ(Social Media) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. नुकताच उर्फीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फीने गुलाबाच्या पाकळ्याचा नवीन लूक केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Urfi Javed
Ranveer Singh : न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंगसाठी NGO कडून कपड्यांची 'जुळवाजुळव'

व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच उर्फीचा नवीन बोल्ड लूक समोर आला आहे. उर्फीने गुलाबाच्या पाकळ्यांनी अंग झाकले असून तिच्या चारही बाजूला गुलाबाच्या पाकळ्या आहेत. उर्फीचा बोल्ड लूक गुलाबी मेकअप आणि मोकळ्या केसांमुळे आणखी खुलून दिसतो आहे. व्हिडिओमध्ये उर्फीच्या गोड हसण्याने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.

Urfi Javed
Disha Patani Video : दिशा पटानी चार पावलं चालली, दोनदा अडखळली

सध्या सोशल मीडियावर न्यूड फोटोशूटचे ट्रेंड सुरू आहे, अलीकडेच रणवीरनेही त्याचे न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले. रणवीर सिंगनंतर उर्फीने बोल्ड फोटोशूट करून तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. उर्फी जावेदच्या नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक नेटिझन्सनी कमेंट केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या बोल्ड लूकची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत केली आहे. 'रणवीर सिंग आणि उर्फीचे फार लांबचे नाते नाही, दोघांचा छंद एकच आहे,' अशी कमेंट एका यूजरने केली. 'हिचे आणि रणवीर सिंगचे लग्न लावून द्या', अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. तर एका ब्युटी इनफ्लुएन्सरने लव्ह इमोजीसह 'उफ...! उर्फीच फक्त असं करू शकते', अशी कमेंट केली आहे.

अलीकडेच, बॉलिवूड स्टार रणवीर सिंग 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये पाहुणा म्हणून गेला होता. तिथे उर्फीच्या अनोख्या फॅशन सेन्सचे कौतुक करत एका सेगमेंट दरम्यान, 'उर्फी एक 'फॅशन आयकॉन' आहे,' असे रणवीर म्हणाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com