Urfi Javed Tissue Paper Fashion
Urfi Javed Tissue Paper FashionSaam Tv

Urfi Javed: ‘घरातले टिश्यू कुठे गेले?’ ऊर्फीने त्याच टिश्यूचा ड्रेस बनवला आणि...

अनेक गोष्टींचा वापर करत आपल्या फॅशनची हौस पुर्ण करणारी उर्फी पुन्हा एका फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Urfi Javed Tissue Paper Fashion: बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींच्या फॅशनची आपल्याला भूरळ पडली. त्यांची फॅशन करण्याची चाहत्यांनी अनेकदा प्रयत्न ही केला. पण सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेदची फॅशन सहसा कोण कॉपी करण्याचा प्रयत्न करत नाही. अनेक गोष्टींचा वापर करत आपल्या फॅशनची हौस पुर्ण करणारी उर्फी पुन्हा एका फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Urfi Javed Tissue Paper Fashion
Jacqueline Fernandez: ‘तुमच्यासाठी कायपण..!’ जॅकलिनच्या वाढदिवसाला सुकेश चंद्रशेखरने लिहिलं थेट जेलमधून पत्र

प्रत्येक गोष्टीतून स्वतःचे कपडे बनवणाऱ्या उर्फीने कधी सायकलची साखळी तर कधी बांबू तर कधी मोबाईलचे सिमकार्ड. अशा गोष्टींचा वापर करणाऱ्या उर्फीची फॅशन नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होते. गेल्या काही दिवसांपुर्वी तिने काचेचा वापर करत फॅशन केली होती. आता या सर्व गोष्टींचा वापर करत केलेल्या उर्फीने आता मर्यादा ओलांडली आहे. स्वतःला टिश्यू पेपरमध्ये अशा प्रकारे गुंडाळले की नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा धर्माचा धडा शिकवला.

उर्फी जावेदने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, “तिची बहीण आसफी जावेद दिसत आहे. तिच्या आईला टिश्यू पेपरबद्दल विचारते. ती म्हणते- मम्मी सगळे टिश्यू पेपर कुठे गेले? कालच आणले. यानंतर, अचानक तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती म्हणते - उर्फी आली का? यानंतर उर्फी तिच्या नव्या अवतारात दिसत आहे. तिने त्याच कागदांपासून बनवलेला टू-पीस ड्रेस घातला आहे.”

मात्र,तिचा हा ड्रेस इतर ड्रेसपेक्षा बराच चांगला आहे. पण तरीही नेहेमीप्रमाणे नेटकऱ्यांना तिची फॅशन पुन्हा एकदा आवडलेली नाही. त्यांनी तिला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी तिला पवित्र रमजान महिन्याची आठवण करून दिली. कोणीही कितीही बोलल किंवा टिका केली तरी उर्फी काही कुणाच ऐकणार नसल्याचं दिसतयं. असंही नेटकरी म्हणत आहेत.

तिच्या व्हिडिओलाही अनेक कमेंट आल्या आहेत. एकानं लिहिलयं की, किमान रमजानमध्ये तरी असे फालतू काम सोडं तर दुसऱ्याने लिहिले की, आता टॉयलेट पेपरही तर एकाने विचारले, उर्फी जी घालायला अजून काही उरले आहे का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com