Urfi Javed: उर्फीने स्वत:ला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलं, फॅशन पाहून चाहत्यांनी वाजवल्या शिट्ट्या

कधी फुलं, झाडांची पानं, ब्लेड, साखळी तर कधी मोबाईलचे सिम कार्डचा वापर करत उर्फीने आणखी एक नवी फॅशन केली आहे.
Urfi Javed New Fashion
Urfi Javed New FashionSaam Tv

Urfi Javed New Fashion: फॅशन सेन्सेशन अभिनेत्री ऊर्फी जावेद कधीच हटके फॅशन करण्याचं सोडत नाही. कुठे ही तिला पापराझी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हजरच असतात. उर्फीची फॅशन सध्या सर्वत्रच चर्चेत आहे. अनेक अभिनेत्री तिला कॉपी करण्याचा ही आता प्रयत्न करू लागले. अशातच आणखी एक तिने फॅशन करत आपली चर्चा जोरात केली आहे.

कधी फुलं, झाडांची पानं, ब्लेड, साखळी तर कधी मोबाईलचे सिम कार्ड वापरत तिने आपली फॅशन ट्रिक वापरली आहे. आता पुन्हा एकदा हटके फॅशन करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ऊर्फीने आता डायनिंग टेबलच्या कव्हरपासून ड्रेस बनवला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Urfi Javed New Fashion
दीपिका करणार परदेशात जलवा, Oscar 2023 मध्ये सांभाळणार मुख्य जबाबदारी

'विरल भय्यानी' या सोशल मीडिया पेजवरुन उर्फीच्या नव्या लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा बिकिनी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसखाली तिने ट्रान्सपरंट स्कर्ट परिधान केला आहे. हा स्कर्ट डायनिंग टेबलच्या कव्हरपासून बनवल्याचं उर्फीने म्हटलं आहे. हाय पोनी बांधत उर्फीने हेअरस्टाइल केली आहे. मोठे कानातले व साजेसा मेकअप करुन तिचा ग्लॅमरस लूक आहे.

उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून ट्रोलिंग करणं काही सोडलेलं नाही. एक नेटकरी म्हणतो,' तु असे ड्रेस घालते म्हणूनच पॉलिथीन बॅन केलं', तर आणखी एक युजर म्हणतो, 'कंडोमपासून कधी ड्रेस बनवणार?', 'स्वस्तात मनोरंजन आहे उर्फीचं' म्हणत एका नेटकऱ्याने तिची खिल्ली उडवली आहे. सोबतच 'नो टू प्लॅस्टिक' म्हणत आणखी एका युजरने तिला ट्रोल केलंय.

कपड्यांवरुन ट्रोल होणारी उर्फी आता तिच्या विधानांमुळे ही चर्चेत राहते. उर्फी समाजातील काही घडामोडींवर आपलं स्पष्ट आणि परखड मत मांडते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com