'...मला त्याच्या वडिलांवर क्रश'; Urfi Javed ची 'ती' स्टोरी चर्चेत

उर्फी जावेद जे काही बोलते ते उघडपणे बोलते. असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा उर्फीने आपल्या स्पॉट रिस्पॉन्सने सर्वांची तोंड बंद केली आहेत.
'...मला त्याच्या वडिलांवर क्रश'; Urfi Javed ची 'ती' स्टोरी चर्चेत
Urfi JavedInstagram/@urf7i

आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपल्याला कोणा ना कोणावर क्रश असतो. हो ना? सध्या काही जणांची क्रश असलेली सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदचा (Urfi Javed) देखील कोणावर तरी क्रश (Crush) आहे. आता हा कोण आहे जो उर्फीचा क्रश आहे हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता वाटत आहे ना? पण हे ऐकून आश्चर्य वाटण्याचे काही कारण कारण नाही कारण उर्फीचे हृदय अशा सेलिब्रिटीवर आले आहे, ज्याने केवळ तिलाच नाही तर संपूर्ण जगाला वेड लावले आहे. जाणून घेऊया कोण आहे ती खास व्यक्ती?

Urfi Javed
पॉप स्टार Justin Bieber ला चेहऱ्यावर पॅरालिसिस अटॅक; Video शेअर करत म्हणाला, माझ्यासाठी...

उर्फीला कोणी वेड लावलंय?

उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. याशिवाय ती कधी कधी विचित्र विधाने करते हे ही वेगळच. परंतु यावेळी उर्फीने तिच्या क्रशबद्दल सांगितले आहे. होय! उर्फीचा क्रश दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan)आहे. उर्फीने इन्स्टा स्टोरीवर किंग खानचा फोटो शेअर करताना याचा खुलासा केला आहे.

Urfi Javed Insta Story
Urfi Javed Insta StoryInstagram/@urf7i

उर्फी जावेदने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, आर्यन खान (Aryan Khan) माझ्या वयाचा आहे, पण मला त्याच्या वडिलांवर क्रश आहे. उर्फीला जे काही म्हणायचे होते ते सांगितले गेले, पण शाहरुख खान की आर्यनची ही पोस्ट पहिली की नाही हे माहित नाही.

बेधडकपणे सांगते मनातल्या गोष्टी;

उर्फी जावेदचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती जे काही बोलते ते उघडपणे बोलते. असे अनेक वेळा झाले आहे की उर्फीने आपल्या स्पॉट रिस्पॉन्सने सर्वांची तोंडे बंद केली आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते सार्वजनिक ठिकाणी असो किंवा सोशल मीडियावर, चुकीच्या गोष्टीवर ती लगेच बोलून व्यक्त होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com