
Urfi Javed New Video: उर्फी जावेद हे नाव एक दिवस कानावर पडले नाही किंवा डोळ्यासमोरून गेले नाही असे होत नाही. उर्फी आणि तिचे अंतरंगी ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. आज होळीचं निमित्त साधून उर्फीने पुन्हा रंग उधळले आहेत.
उर्फीने तिच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत उर्फी नेटकऱ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये उर्फीने वेगवगेळे रंग उधळले आहेत. मात्र, उर्फीच्या होळीच्या शुभेच्छांपेक्षा तिच्या कपड्यांवर चाहत्यांच्या खिळल्या आहेत. उर्फीने घातलेला स्कर्ट आहे. पाहून तुम्ही हसावं की रडावं असं म्हणतं डोक्यावर हात माराल.
उर्फीने पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेट घातलं आहे. तसेच एका हातात हातमोजे घातले आहेत. उर्फी व्हिडिओमध्ये रंग उधळताना दिसत आहे. तसेच हा व्हिडिओ रिव्हर्स मोशनमध्ये आहे. 'शाम गुलाबी शेहर गुलाबी' या गाण्याचा वापर करत उर्फीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
मात्र, यावेळी चाहत्यांच्या नजरा उर्फीच्या फाटलेल्या स्कर्टवर खिळल्या आहेत. उर्फीचा स्कर्ट कंबरेवर नसून गुडघ्यांवर घातला आहे. उर्फीने या पांढऱ्या ड्रेससोबत लाल हिल्स घातल्या आहेत. तर तिची वेणी वाऱ्यावर झुलत आहे, तिचा हा अवतार पाहून तुम्हाला हसू आवारात येणार नाही.
बार जर तुम्ही उर्फीच्या ड्रेसचे निरीक्षण कराल तर तुमच्या लक्षात येईल की, तिचा ड्रेस अंतरंगी आणि वेगळा आहे. एक हातात हातमोजे आहेत तर एका हाताला नुसत्या बाह्या आहेत. तर तिने घातलेला स्कर्ट आहे की पॅन्ट हे फक्त उर्फी जाणो आणि तिचा डिझाइनर. या तिच्या स्कर्ट किंवा पॅन्ट एका बाजूने पूर्ण आहे आणि एका बाजून अर्धवट. तसेच तिने जे काही प्रकरण घातले आहे आहे त्यात स्वतःला बांधून घेतले आहे.
उर्फी जावेदचा हा ड्रेस पाहून चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. हिंदूंच्या सण होळीची खिल्ली उडवल्याबद्दल काही लोक उर्फीला ट्रोल करत आहेत. तसेच काही चाहते उर्फीच्या ड्रेसवर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'होळीपेक्षा जास्त, आमची नजर तुझ्या ड्रेसवर अडकली आहे'
उर्फी जावेद तिच्या फॅशन आणि स्टाइलने जबरदस्त लाईम लाइटमध्ये येत असते. अलिकडेच उर्फीने प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या पार्टीला हजेरी लावली होती. जिथे तिने स्टनिंग आउटफिट्समध्ये भारी पोज दिल्या. उर्फीला तिच्या विचित्र कपड्यांमुळे अनेकवेळा ट्रोल करण्यात आले आहे, मात्र यूजर्सच्या कमेंट्स आणि लोकांच्या कमेंट्सनी तिला काहीही फरक पडत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.