
Urfi Javed Share Video: अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच काहीतरी अतरंगी करत असते. तिचे कपडे, मेकअप, बोलणं सगळ्याची चर्चा होते. उर्फीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी खूप स्ट्रगल करत आहे. चला तर पाहूया उर्फीचा हा स्ट्रगल नेमका आहे तरी कशासाठी.
उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी चहा पिण्यासाठी स्ट्रगल करताना दिसत आहे. तिला हा स्ट्रगल तिच्या विचित्र ड्रेसमुळे करावा लागत आहे. (Latest Entertainment Video)
उर्फीने ब्लॅक ब्रॅलेट आणि मॅचिंग जॉगर्ससह टॉप म्हणून ब्लॅक मेटल ग्रिल घातली होती. तर व्हिडिओमध्ये अभिनेत्री चहा पिण्यासाठी जागा शोधात आहे. मेटल ग्रिल तिच्या बरोबर तोंडापुढे आल्याने तिला चहा पिता येत नाहीये. उर्फी चहा पिण्यासाठी कप त्या ग्रीलच्या अवतीभोवती नाचवत आहे. अखेर ती चहा पिण्यात यशस्वी झाली.
तिने हा व्हिडिओ पोस्ट करत त्या;त्याला कॅप्शन देखील दिले आहे. उर्फीने लिहिले आहे की “जेव्हा चाय जास्त महत्त्वाची असते.” यावरून हे तर लक्षात आलं कि उर्फी चहा प्रेमी आणि आणि त्यासाठी ती कितीही स्ट्रगल करायला तयार आहे.
उर्फीने व्हिडिओ शेअर केला आणि त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत असे होणारच नाही. उर्फीचा हा व्हिडिओ पाहिलं अनेक नेटकऱ्यांनी तिला स्ट्रॉ वापरण्याचा सल्ला दिला. तर एक नेटकाऱ्याने म्हटले आहे, "तो तुमच्या कपाळावर ओता म्हणजे थेट तुमच्या तोंडात जाईल." दुसर्याने लिहिले आहे, "फक्त या दिवसासाठी स्ट्रॉचा शोध लावला गेला."
उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल होत असते. अलीकडेच उर्फी वांद्रे येथील रेस्टॉरंटमध्ये तिच्या बहिणीसोबत जेवायला गेली होती. तेव्हा गरीब मुलांना 500 रुपयांची नोट देऊन तिने अनेकांची मने जिंकली. नेटकऱ्यांनी तिच्या स्वभावाचे कौतुक करत तिला “मोठ्या मनाची” म्हटले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.