Urfi Javed: उफ्फ ! ही तर मच्छरदाणीच... उर्फीच्या जाळी लूकवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर 'व्हायरल गर्ल' उर्फीच्या हटके स्टाईलने आता नवा उच्चांक गाठला आहे.
Urfi Javed New Dress
Urfi Javed New DressSaam Tv

मुंबई: इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) ही ग्लॅमर विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेली स्टार आहे. सोशल मीडियावर 'व्हायरल गर्ल' उर्फीच्या हटके स्टाईलने आता नवा उच्चांक गाठला आहे. नेहमीच नवनवीन प्रयोग करत प्रसिध्दीझोतात राहणाऱ्या उर्फीचा नवीन लूक समोर आला आहे. उर्फीचा नवीन लूक पाहून चाहते चांगलेच चक्रावून गेले आहेत.

Urfi Javed New Dress
Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेन-ललित मोदी यांच्या प्रेमानं गुगललाही बहर; या सेलिब्रिटींविषयी जाणून घेण्यास लोकांना सर्वात जास्त इंटरेस्ट

उर्फी जावेद ही सोशल मीडिया (Social Media) इनफ्ल्युएन्सर आहे. अनेकदा उर्फी तिच्या बोल्ड आणि हॉटलूकने इंटरनेटचा पारा वाढवते. पुन्हा उर्फी तिच्या हटक्या स्टाईलने चाहत्यांच्या भेटीला आली आहे. नेहमीच फॅशन स्टाईलने चाहत्यांना प्रभावित करणारी उर्फीने हिरवा रंगाचा सी थ्रू ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये जाळीदार नेटच्या ड्रेसमध्ये उर्फीने बिकनी परिधान केल्याचे दिसते आहे.

या नव्या लूकमध्ये उर्फीने हिरव्या रंगाच्या जाळीदार ड्रेसने स्वता:ला तोंडापासून पायापर्यंत झाकले आहे. यासह उर्फीने चॉकर नेकलेस कॅरी केला आहे. न्यू सी- थ्रू ड्रेसमध्ये कॅमेरासमोर मोहक पोझ देताना उर्फी टिपली गेली आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा न्यू लूक तूफान व्हायरल होत आहे.

Urfi Javed New Dress
Sayaji Shinde : अभिनेता सयाजी शिंदेंचे राजकीय नेत्यांना चिमटे; म्हणाले,'आता चांगभलं...'

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.उर्फीच्या न्यू लूकवर काही तासातंच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. तर काहीना तिची नवीन स्टाईल आवडली नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला देखील सुरूवात केली आहे.सोशल मीडियावर उर्फीच्या लूकवर प्रतिक्रियांचा भडीमारा सुरू झाला आहे. एका यूजरने, हिरव्या पालेभाज्या. तर तिथे दुसऱ्याने हा काय मूर्खपणा आहे. तर आणखी एकाने उर्फीचा ड्रेस म्हणजे जणू मच्छरदाणी अस म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com