Urfi Javed: उर्फी जावेदने कास्टिंग काऊचबाबत केला गौप्यस्फोट, म्हणाली माझ्यावर बळजबरी...

उर्फी जावेद सुद्धा अडकली आहे कास्टिंग काऊचच्या जाळ्यात.
Urfi Javed
Urfi JavedSaam Tv

Urfi Javed on Casting Couch: उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे देखील लोकंच्या नजरेत येते. तिच्या फॅशन सेन्स आणि बिनधास्त वक्त्यांमुळे उर्फी नेहमीच ट्रोलर्सच्या निशाणावर असते. मागील काही दिवस उर्फी दुबईमध्ये होती. दुबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. उर्फीने तिच्या जीवनातील असे रहस्य जगासमोर आणले आहे ज्याची कल्पना कोणीही करू शकत नाही.

Urfi Javed
Bigg Boss 16: 'बिग बॉस 16' चा स्पर्धक एमसी स्टॅनच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसैनिक भडकले, तोंडाला काळे फासण्याचा दिला इशारा

उर्फी जावेदने एका मुलाखतीदरम्यान सांगितले, 'ती देखील कास्टिंग काऊचची बळी पडली आहे. उर्फी म्हणाली, 'इतर मुलींप्रमाणे मलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. एकदा माझ्यावर बळजबरी झाली होती, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी अशा परिस्थितीतून बाहेर पडू शकलो.' उर्फीने कोणाचेही नाव घेतले नसले तरी ती काही बड्या लोकांच्या माध्यमातून कास्टिंग काऊचची बळी पडल्याचे झाल्याचे तिने सांगितले. (Actress)

उर्फी जावेदने सांगितले की, 'मी घरातून पळून मुंबईत आले होते. माझ्याकडे इथे कोणतेही काम नव्हते किंवा माझ्याकडे राहण्यासाठी घरही देखील नव्हते. काम मिळवण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. एक काळ असा होता की माझ्याकडे पैसेही नव्हते. मी जेव्हा काम मागण्यासाठी जायचे तेव्हा एका निर्मात्याने मला वेब सीरीजची ऑफर दिली. यासाठी मला जबरदस्तीने बोल्ड सीन्स करण्यास सांगितले गेले. मी नकार दिल्यावर मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. मात्र, मी कशी तरी या सगळ्यातून सुटण्यात यशस्वी झाले.' (Celebrity)

बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अनेक स्टार्स कास्टिंग काऊचचे बळी ठरले आहेत. कास्टिंग काऊबद्दल स्टार्स वेळोवेळी आपला राग व्यक्त करत असतात. #MeToo चळवळीदरम्यान अनेक बड्या कलाकार-निर्मात्यांनी कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला होता. मनोरंजन क्षेत्रातील नवीन कलाकारांना कास्टिंग काऊचला बळी पडावे लागत असल्याचे बोलले जाते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com