Urfi Slam People: मुस्लिम समाजाने घातली उर्फीवर बंदी, उर्फीने एकाच वाक्यात केली सर्वांची बोलती बंद

उर्फीला कबरस्तानात जागा देऊन अशी मागणी केली आहे.
Urfi Javed share new look
Urfi Javed share new lookSaam Tv

Urfi Reaction On Fatwa: उर्फी जावेद नाव पुरेसे आहे. उर्फीचा नाव ऐकताच तुम्हाला केले असा प्रश्न पडत असेल. पण यावेळी उर्फीने काही केले नसून मुस्लिम समाजाने तिला विरोध केला आहे. उर्फी जावेदच्या विरोधात एक फतवा काढण्यात आला आहे. उर्फीला कबरस्तानात जागा देऊन अशी मागणी केली आहे.

मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने उर्फी विरोधात हा फतवा काढला आहे. या व्यक्तीने मुंबईतील सर्व कबरस्तनांमध्ये जाऊन अर्ज दिले आहे. त्या अर्जात 'उर्फीला कबरस्तानात जागा देऊ नये' असे म्हटले आहे. मुस्लिम समाजाने उर्फीला बॉयकॉट केल्याचे म्हटले जात आहे.

Urfi Javed share new look
Kushal Badrike: अमृता समोर झाली कुशल बद्रिकेची फजिती, चंद्राची हूक स्टेप करताना स्टेजवरून खाली कोसळला

अर्ज देणार हा माणूस इतके करून थांबला नाही. त्याने मुस्लिम समाजाचे रक्षण करण्यासाठी हे करत असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच उर्फी हे नाव मुस्लिम असूच शकत नाही, असेही या व्यक्तीचे मत आहे.

आता या फतव्यावर उर्फीने देखील प्रतिक्रिया दिल आहे. उर्फीने म्हटले आहे की, 'हा रिकामटेकडा माणूस आहे कोण? हा माणूस इतका रिकामटेकडा आहे की सगळ्या कबरस्तानात जाऊन अर्ज देत आहे. हा व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे. त्याला लोकांचे अटेंशन हवे आहे. म्हणून तो स्वतः जाऊन हे सगळं सांगत आहे. ठीक आहे काय बोलू मी यावर.

तसेच उर्फी हे नाव मुस्लिम नसल्याचे ऐकताच उर्फी चिडली. तर उर्फीने उलट प्रश्न करत त्या व्यक्तीलाच 'तू आहेस कोण? उर्फी नाव मुस्लिम नाही ठरवणार तू कोण आहेस?' असे विचारले आहे.

उर्फी नेहमीच अनेक वादात अडकते. तिला अनेक अडचणींना देखील तोंड द्यावे लागते. उर्फी तिच्या फॅशनमुळे नेकटऱ्यांच्या निशाणावर असते. आता मुस्लिम समाज देखील उर्फीच्या विरोधात पावले उचलत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com