
Urfi Javed Teddy Bears Jacket: उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड आणि ऑफबीट फॅशनमुळे चर्चेत असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फीला तिच्या लूक आणि आऊटफिटमध्ये नवनवीन प्रयोग करायला आवडतात. ज्यामुळे काही लोकांना ती आवडते तर काही लोक तिला ट्रोल करतात. अलीकडेच उर्फीचा सुपर क्यूट लूक समोर आला आहे.
उर्फीने यावेळी सॉफ्ट टॉयने बनवलेले जॅकेट घातले आहे. तिचा हा लेटेस्ट आउटफिट पाहून सगळ्यांनी तिचे कौतुक केले आहे. उर्फीने या ड्रेसमध्ये क्युट पद्धतीने एन्ट्री केली आणि लाइमलाइटमध्ये आली. तिची ही फॅशन अनेकांना आवडली आहे. (Latest Entertainment Update)
उर्फी जावेदने पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. या ड्रेसच्या बस्टच्या खाली एक छोटा कट दिसत होता. या मिनी ड्रेसमध्ये ती तिचे फ्लॅट टमी आणि लेग्स फ्लॉंट करत होती. उर्फीने आऊट ऑफ द बॉक्स दिसण्यासाठी रंगीबेरंगी जॅकेट घातले होते, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
उर्फीचे हे बहुरंगी जॅकेट सॉफ्ट टॉईजपासून बनवले होते. तिचं हे जॅकेट अनेक लहान टेडीज एकत्र तयार करण्यात आलं होत. यामध्ये हिरवा, पिवळा, निळा, नारंगी, तपकिरी, राखाडी आणि गुलाबी रंगांचा समावेश आहे. जॅकेटवर दिसणारे हत्ती, ससे, कुत्रे आणि टेडी बेअर्स इतके गोंडस दिसत होते की हा प्रकार मुलांना नक्की आवडेल.
लूक पूर्ण करण्यासाठी उर्फीने स्ट्रॅपी फिकट गुलाबी वेज घातले होते. कानात ड्रॉपडाउन झुमके आणि केसांचे सेंटर पार्टीशन करून एक होऊ बन बांधला होता. मेकअपसाठी, उर्फी हेवी फाउंडेशन, फिकट गुलाबी लिपस्टिक शेड, शार्प कॉन्टोर, मस्करा आणि भुवयांना गोलाकार केले होते.
उर्फीचा हा नवा प्रयोग चाहत्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही आवडला आहे. नेहा धुपियाने तिच्या या व्हायरल व्हिडिओवर कमेंट देखील केली आहे. नेहा धुपियाने लिहिले आहे, आतापर्यंतची सर्वात सुंदर ड्रेसिंग. त्यानंतर दुसऱ्या कमेंटमध्ये अभिनेत्री म्हणाली आहे, मला हे हवे आहे. यावरूनच नेहाने उर्फीच्या या क्युट जॅकेटची मागणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.